राज्यात सत्ता परिवर्तनानंतर एकनाथ शिंदेंच्या गटाकडून उद्धव ठाकरेंच्या प्रती सौम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाची प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे फ्लोअर टेस्ट जिंकल्यानंतरही आनंद साजरा करणार नसल्याचं ते म्हणाले होते. बंडखोरांनी उद्धव ठाकरेंबाबत सन्मानजनक गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र दोन्ही गटात संजय राऊत अडथळा ठरत असल्याचं दिसून येत आहे. राऊतांबद्दल बंडखोर आमदारांच्या मनात चांगली प्रतिमा नाही. शिंदे गटाने तर संजय राऊतांना एनसीपीचे शरद पवार यांचा एजंट असल्याचं म्हटलं आहे.
बुधवारी शिंदेंच्या गटाने आमदार संजय राठोड म्हणाले की, जेव्हा मातोश्रीचं दार उघडले ते नक्की उद्धव ठाकरेंकडे जातील. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जर आज आमची भूमिका पसंत नसली तरी दोन महिन्यात त्यांना आमची भूमिका योग्य वाटेल. जेव्हा कधी मातोश्रीचं दार उघडेल आम्ही त्यांच्याजवळ जाऊ.
उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर नक्की जाऊ…
यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये सामंजस्य होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर आम्ही मातोश्रीला नक्की जाऊ. मात्र आम्ही थेट उद्धव ठाकरेेंना भेटू. मात्र यादरम्यान त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बाहेर ठेवायला हवं. अशावेळी केसरकरांचा निशाणा हा संजय राऊतांवर असल्याचं मानलं जातं.
याशिवाय शिंदे गटाचे आणखी एक आमदार सुहास कांडे यांनी सांगितलं की, जर उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर ते चर्चेसाठी मातोश्रीवर नक्की जातील. आमची इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलावावं आणि आम्ही त्यांना भेटायला जाऊ. जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बोलावलं तर सर्वजण एकत्र मातोश्रीवर जाऊ.
उद्धव ठाकरेंना समेट करण्याचा सल्ला
ठाकरे गटातही असेच प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाच्या हितासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाशी समेट करण्याची सूचना केली होती. मात्र ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप कळू शकलेली नाही.
आनंदराव अडळूळांनी दिला राजीनामा…
यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी खासदार आनंदराव अडळून यांनी पक्षाच्या नेत्याचा राजीनामा दिला आहे. अडसूळ यांनी यापूर्वी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु 2019 मध्ये नवनीत राणा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आनंदराव यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार का, असे विचारले असता अभिजीत म्हणाले, माझे वडील शिवसैनिक राहतील.