मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचे मुंबईतील निवावस्थान सिल्व्हर ओकवर ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे, पण त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन कक्षात गेले होते. त्यानंतर ते थेट पवारांच्या निवावस्थानी गेले. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकटेच होते, त्यांच्यासोबत अन्य कोणताही नेता नव्हता अशी माहिती आहे.