फडणवीस यांना दोनदा पैसे मिळाले, अनिल गोटे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे ईडी कार्यालयात तक्रार करण्यासाठी आले होते. आर. के डब्ल्यू.. म्हणजे राजेश कुमार वाधवान ज्यांनं पीएमसी बँक बुडवली, जो स्वतः आता तुरुंगात आहेत, त्याच्या कंपनीचा इक्बाल मिर्ची हा भागीदार आहे. ज्यावेळेला 2014-15 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आलं. त्या नंतर त्यांनी सरकारला दत्तक दिलेली ही देणगी आहे. जसं नवाब मलिकांना त्यांनी अतिरेक्यांशी संबंध असलेल्या माणसाकडनं जमीन घेतली म्हणून अटक केली. आता हा तर डायरेक्ट अतिरेक्याशीच संबंध असल्याच मी पुरावा तुम्हाला दाखवतोय हा पुरावा.. हा इलेक्शन कमिशनचा कागद त्याचा पुरावा आहे. 46 नंबरवर त्याचं नाव आहे. याचे डिटेल्स आता मी त्यांना दाखवणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

माझी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार आहे. राकेश कुमार वाधवानकडून त्यांना 10 कोटी रुपये मिळाले आहेत. आरके डब्ल्यू कंपनीनं एकदा नाही दोनदा त्यांना पैसे दिलेत. आर के डब्लू चा पैसा आहे. इकबाल मिर्ची 93 ब्लास्टमध्ये ज्याचा सहभाग होता, त्या ही देणगी देण्यात आली होती. 2014 आधी त्यांना असं डोनेशन कधीच मिळालं नव्हतं. सरकार आल्यानंतर देणगी मिळाली. 20 कोटी रुपये देण्यात आलेत. सरकार आल्यानंतर हे पैसे देण्यात आलेत, असं अनिल गोटे म्हणाले.

इकबाल मिर्ची दाऊदचा राईट हॅन्ड असलेल्याकडून पैसे घेतलेत. नवाब मलिकांना तुम्ही तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक करत असाल तर तुम्ही तर त्याच्याहीपेक्षा मोठे आरोपी आहात. हे तर डायरेक्टच आहेत, असंही अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं.

मी भाजपमध्ये असताना मला माहित नव्हतं. मलिकांना अटक केल्यानंतर मी संशोधन केलं, त्यात मला ही सनसनाटी माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाबदार नागरिक म्हणून मी इथं आलो. ईडीनं आता यावरही कारवाई करावी. दर मंगळवारी फडणवीसांच्या काळात असलेल्या मंत्र्याची इथं येऊन तक्रार करणार आहे. पुराव्यानिशी तक्रार करणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.