बहुमत चाचणी झाल्यास विथानसभेतील पक्षनिहाय सद्यस्थिती काय?

भाजपच्या शिष्टमंडळाने काल रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेतील सद्यस्थिती काय आहे. शिवसेना आपलं बहुमत सिद्ध करु शकेल का? या सर्व शक्यतांवर आकडेवारीनुसार नजर टाकूया.

शिवसेना – 16

राष्ट्रवादी काँग्रेस- 53

काँग्रेस – 44

एकूण- 113

भाजप+शिंदे गट

शिंदे गट- 39

भाजप- 106

एकूण- 144

मात्र एकनाथ शिंदे यांचा गट बहुमत चाचणीला गैरहजर राहिल्यास परिस्थिती काय असू शकते. असं झाल्यास बहुमताचा आकडा 125 वर येईल. त्यामुळे हा आकडे गाठणे भाजपला सहज शक्य होऊ शकतं.

शिंद गट गैरहजर राहिल्यास

भाजप+ – 112

बविआ- 3

शेकाप – 1

शिंदे गटातील अपक्ष- 11

इतर अपक्ष- 2

एकूण- 129

मविआ सरकारकडे काय आहे पर्याय?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली तर सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हे निश्चित आहे. हाच मुद्दा सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही उपस्थित करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.