बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याने ११ जुलै आधी बहुमत चाचणी होणार की नाही?
स्वपक्षाविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदें च्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने ११ जुलैची असेल असं स्पष्ट केलं आहे. या सुनावणीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात बंडखोर आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळेच ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यातच आता ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत चाचणी होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. असं असलं तरी न्यायलयाने यासंदर्भात शिवसेनेला आणि पर्यायाने ठाकरे सरकारला काहीसा दिलासा देणारा निर्णय दिलाय.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ; राज्यातील मंत्र्यांना कोरोनानं घेरलं; झाले क्वारंटाईन
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यात दुष्काळात तेरावा म्हणून कोरोनाही एका एकाचा समाचार घ्यायला विसरत नाहीये. आधी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री यांना कोरोनची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
खाते फेरवाटप: बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढली; मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाई
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्याकडील त्यांच्याकडील खाती काढून घेतली आहेत.संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खातेसुद्धा शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आलं आहे. शिवसेनेतून नुकतेच एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)
‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मोठा अडथळा
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये एकनाथ शिंदे गटाने आपण महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, असं सांगितलं आहे, पण त्यांनी राजभवनाला अजून तसं पत्र पाठवलेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या मते एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत. यासाठी आंबेडकर यांनी कारणही दिलं आहे. सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी, कारण तसे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत, ज्यात न्यायालय मध्ये येऊ शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
केतकी चितळेला मोठा दिलासा! कडक कारवाई न करण्याचे हायकोर्टा चे आदेश
मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. याप्रकरणानं राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. राजकीय वातावरणही जोरदार पेटलं होतं. केतकीच्या या वक्तव्याची दखल घेत तिला तुरुंगातही जावं लागलं. अॕट्रासिटी अंतर्गत केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यत घेतलं होतं. नुकतंच काही दिवसांपूर्वी केतकीची सुटका करण्यात आली. अशातच केतकीविषयी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केतकीनं शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी 21 प्रलंबित एफआयआरमध्ये केतकी चितळेला महाराष्ट्र पोलिसांनी अंतरिम दिलासा दिला आहे.
केतकी चितळेला अंतरिम दिलासा मिळाला असून केतकीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करु नये, असे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणी कमी झाल्याचं पहायला मिळतंय. केतकीवरची अटकेची टांगती तलवार आता गेली आहे.
सातवा दिवस बंडखोर आमदारांचा, एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरे अन् आनंद दिघेंची काढली आठवण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर आता शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे.हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ठाणेकरांसाठी चिंतेची बातमी! मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 10 टक्के पाणीकपात
मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच ठाणे महानगरपालिकेसुद्धा याच संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगपालिकेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यालाही लागू आहे.
उत्तर प्रदेश: लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला भाजपाने पाडले खिंडार
उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रामपूर आणि आझमगड या दोन्ही मतदार संघात समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. या निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही मतदार संघात सभा घेतली होती. भाजपाने दोन्ही मतदार संघात पूर्ण ताकद लावली असताना अखिलेश यादव मात्र प्रचारापासून दूर होते. आझमगडमध्ये बहुजन समाज पक्षाच्या दमदार कामगिरीने समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. दोन्ही पोटनिवडणुका जिंकून भाजपने आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरसुद्धा त्यांचे वर्चस्व असल्याचे दखवुन दिले आहे.
अयोध्येत सापडले बेवारस १८ हातबॉम्ब; परिसरात खळबळ
अयोध्येतील कॅन्ट परिसरात सोमवारी दुपारी १८ हातबॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेवारस हातबॉम्ब मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. लष्कराच्या अधिकांऱ्यांनी हे हातबॉम्ब ताब्यात घेत नष्ट केले आहेत. हातबॉम्ब सापडलेल्या परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.
मुकेश अंबानींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नाही तर त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केंद्राने केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाना २८ जूनला याबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे.
पुढच्या 3-4 तासांत जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याने म्हटले आहे की, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आता पुढील 3, 4 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारी 2.45 च्या उपग्रह निरीक्षणातून असे दिसून येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.तसेच हवामान खात्याने पुढे म्हटले की, रायगड जिल्ह्यालाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे आहे. तर मुंबई ठाण्यात अंशतः ढगाळ आकाश आहे. घाट भागातही पावसाच्या काही तीव्र सरींसाठी अनुकूल दिसत आहे, असे विभागाने म्हटले आहे.
पुण्यातील व्यक्तीने विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा
येत्या काळात बकरी ईद आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बकरे आणि बकऱ्या विकल्या जातात. त्यात एखादा बकरा लाखो रुपयांमध्ये विकल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? तर मध्यप्रदेश राज्यातील भोपाळमध्ये देशातील सर्वात महागडा बकरा विकला गेला आहे. हा बकरा कोटा जातीचा आहे. तसेच याचे नाव टायटन असे आहे. बकरी ईदवर कुर्बानीसाठी भोपाळमध्ये तब्बल 7 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. हा बकरा कोटा जातीचा आहे. त्याचे नाव टायटन असे आहे. या बकऱ्याची देखभाल करणाऱ्या सैयद शाहेब अली यांनी दावा केला आहे की, तूप, लोणी आणि औषधी वनस्पती खाऊन तयार होणारा हा देशातील सर्वात महागडा बकरा आहे.
SD Social Media
9850 60 3590