तुरटी सहसा प्रत्येकाच्या घरात असते. अनेक लोक तुरटीचा वापर करतात. स्वयंपाकघरातील गरजांपासून ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपर्यंत तुरटी खूप उपयुक्त असते. दातांमध्ये वेदना होत असतील तर तुरटीच्या पाण्याने या वेदना कमी केले जातात. त्याचप्रमाणे कट लागल्यास किंवा शरीरावर कुठे कापले गेल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठीही तुरटी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणारं आहोत की, अँटिसेप्टिक गुणांनी समृद्ध असलेली तुरटी वापरून तुम्ही तेलकट त्वचा आणि तेलकट केसांच्या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकता. स्किन आणि हेअर केअर एक्सपर्ट विकी आनंद यांच्याकडून तुरटी वापरण्याच्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया.
अनेक लोकांच्या त्वचेची छिद्रे खूप उघडी असतात. ती कमी करण्यासाठी तुम्ही तुरटीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही पाण्यात थोडी तुरटी पावडर टाका आणि काही वेळ ठेवा. यानंतर हे पाणी गाळून त्यात गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर स्प्रे करा. काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आपण दररोज टोनर म्हणून याचा वापर करू शकता.
तेलकट त्वचा
जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर तुम्ही तुरटीचा फेस पॅक वापरू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये थोडी तुरटी पावडर मिसळून पॅक बनवा. त्यानंतर त्यात थोडे गुलाबजल टाका आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.
तेलकट केस
जर खूप तेलकट केसांची समस्या असेल तर तुम्ही तुरटीच्या हेअर मास्कची मदत घेऊ शकता. हा मास्क बनवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये थोडी तुरटी पावडर मिसळा आणि याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट हेअर मास्कप्रमाणे टाळूवर लावा. काही वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा.