आज दि.२८ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

कधी कधी वाटतं हे सर्व बघण्यापेक्षा मी मेलो…उदयनराजे सर्वांसमोर रडले!

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमधून राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. बोलताना उदयनराजे भावुक झाल्याचंही पहायला मिळालं. आता जनतेनं विचार कारायला हवा. आपण इतिहासाचं विकृतीकरण करणं कधी थांबवणार आहोत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महापुरुषांचा अपमान हा देशद्रोहाचा गुन्हा का होऊ नये असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार? न्यायालयाकडून पुन्हा समन्स

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे. संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. बेळगावात सीमा प्रश्नावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स पाठवलं आहे. एक डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे एक डिसेंबरला न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे.

योगा आणि डाएटच्या मदतीनं नवज्योतसिंग सिद्धूंनी तुरुंगात कमी केलं तब्बल 34 किलो वजन

पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू 1988 च्या रोड रेजप्रकरणी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या पटियाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. तुरुगांतील मागच्या सहा महिन्याच्या काळात त्यांनी तब्बल 34 किलो वजन कमी केलं आहे, असा दावा त्यांच्या एका मित्राने केला आहे. डाएट, योग आणि व्यायाम याच्या मदतीने त्यांनी वजन कमी केल्याचं म्हटलं जातंय. 6 फूट 2 इंच उंच सिद्धू यांचं वजन आता 99 किलो झालं आहे.

भाजपच्या मुस्लीम महिला नेत्याने भगवान श्री रामाला म्हटलं पैगंबर

भाजपच्या महिला मुस्लिम नेत्या रुबी आसिफ खान या अनेकदा चर्चेत असतात. घरात गणपतीची स्थापन केल्यापासून ते नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता त्यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबोधनपर परिषदेने हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक दृढ झाल्याचे रुबी यांनी म्हटले आहे. तसेच त्या जाहीर सभेला अनेक मुस्लिम गेले होते. त्या पुढे म्हणाल्या की, आता मुस्लिम समाजातील लोकांना हे समजू लागले आहे की भगवान श्रीराम आमचे पैगंबर होते आणि सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवरील सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून रखडली असून त्यातील त्रुटींमुळे सुधारित मसुदाही सादर होऊ शकलेला नाही. आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हिरवा कंदील दाखविल्याने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकेल की नाही, यासह काही तांत्रिक मुद्दय़ांवर संभ्रमाचे वातावरण आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल केल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात आली आहे. आरक्षण रद्दबातल करताना माजी न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालातील काही मुद्दे विचारात घेण्यात आले नाहीत व काही परिशिष्टे जोडली गेली नव्हती. त्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी फेरविचार याचिकेत करण्यात आली आहे.

राज्यात अपघातांच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी वाढ; नऊ महिन्यांत जखमींची संख्या २२ टक्क्यांनी वाढली

अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो; परंतु राज्यात गेल्या तीन वर्षांत अपघात, अपघातातील मृत्यू व जखमींची संख्या वाढली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांतील सारख्या कालावधीची तुलनात केल्यास या नऊ महिन्यांत अपघात १४.७२ टक्के, अपघाती मृत्यू १२.८७ टक्के, अपघातातील जखमींची संख्या २२ टक्यांनी वाढली.

गुजरातमध्ये स्टार प्रचार असणाऱ्या योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार करण्यास गुजरातमध्ये स्टार प्रचारक म्हणून जात आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या गृहराज्यात म्हणजेच उत्तर प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारालाही सुरूवात केली आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील चर्चेसाठी बोम्मई यांची दिल्लीवारी

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. बोम्मई यांच्या याच विधानानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. याच कारणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाच बोम्मई यांनी या प्रश्नावरील चर्चेसाठी दिल्लीकडे धाव घेतली आहे. ते दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. तसेच सीमाप्रश्नावर ते अॕड. मुकूल रोहतगी यांच्या बातचीत करणार आहेत.

वर्ल्ड रेकॉर्ड करुनही ऋतुराजनं ‘या’ खेळाडूशी शेअर केला सामनावीर पुरस्कार

महाराष्ट्रानं विजय हजारे करंडकात आज उत्तर प्रदेशचा धुव्वा उडवून सेमी फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या आजच्या विजयाचे हीरो ठरला तो युवा फलंदाज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड. ऋतुराजनं या सामन्यात द्विशतक तर झळकावलंच पण त्याचबरोबर एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा अशक्यप्राय विक्रम आपल्या नावावर केला. त्यामुळे या मॅचचा खरा मॅन ऑफ द मॅच ऋतुराज गायकवाडच होता. कॉमेंटेटर्सनीही सामन्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऋतुराजला पुढे येण्याची विनंती केली. पण त्याचवेळी ऋतुराजनं हा पुरस्कार एकट्यानं न स्वीकारता आणखी एका खेळाडूला पुढे येण्याची विनंती केली आणि त्याच्यासोबत हा पुरस्कार शेअर केला.त्यामुळे मॅचनंतर कॉमेंटेटरनं जेव्हा मॅन ऑफ द मॅचसाठी ऋतुराजला बोलावलं तेव्हा त्यानं हंगर्गेकरचंही नाव घेण्याची विनंती केली. आणि त्याच्यासोबतच हा पुरस्कार शेअर केला. ऋतुराजच्या या कृतीनं अनेकांची मनं जिंकली.

पीटी उषानं रचला इतिहास, भारतीय ऑलिम्पिकची सांभाळणार जबाबदारी

भारताची महान धावपटू आणि माजी ऑलिंपिक खेळाडू पी. टी. उषा या निवडणुकीत इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) 95 वर्षांच्या इतिहासात पी. टी. उषा या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होणार आहेत. याशिवाय, उषा आयओए प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ऑलंपियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असतील. उषा सध्या राज्यसभेच्या खासदारही आहेत. ‘

उषा यांनी आयओएच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केला आहे . एम. सी. मेरी कोम यांच्या नेतृत्वाखालील आयओएच्या कमिशननं निवडलेल्या आठ ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ आउटस्टँडिंग मेरिट’मध्ये (SOMs) उषा यांचा समावेश आहे. अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या 58 वर्षीय उषा यांनी आयओए अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे उषा ज्यांची बिनविरोध निवड होणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.