जगात सर्वच देशांना सोन्याचे दागिने वापरण्याची नवलाई

सोने खरेदी करणे हा सर्वांचा आवडता विषय आहे. केसांमध्ये आता हॉल मार्क असलेले सोन्याचे दागिने विकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. भारत आणि सोने यांचे नाते खूप प्राचीन आहे. तसे प्रत्येक देशाला सोन्याची एक वेगळी परंपरा आहे.

जगभरामध्ये असलेल्या प्रमुख देशांमध्ये सोन्याच्या वापराचे प्रमाण किती आणि कसे आहे हे आपण पाहू.

भारत : जगात सोन्याच्या दाग दागिन्यांना महत्व देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रंमाक वरचा आहे, परंतु जगाच्या तुलनेत भारताकडे 657 टन सोन्याचे भंडार आहे. जागतिक सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत भारताचा नववा क्रमांक लागतो.

अमेरिका : जगातील सर्वाधिक सोन्याचे भंडार अमेरिकेकडे आहे. 8133.5 टन सोने अमेरिकेकडे आहे. युनायटेड स्टेट्सच्या बुलियन डिपॉजिटरीमध्ये सोने जमा करून ठेवण्यात आले आहे. या सोन्याचे प्रबंधन ट्रेझरी डिपार्टमेंट ऑफ युनायटेड स्टेट्स करीत असते.

जर्मनी : या युरोपीय देशाकडे 3362.4 टन सोन्याचे भंडार आहे. यासोबतच सोन्याच्या भंडाराबाबत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीचे सोने भंडार फ्रॅकफर्टमध्येच्या ड्युश बुंडेस बँकेत, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या न्यूयॉर्क शाखेत आणि लंडनच्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले आहे.

स्वित्झरलँड : जगातील श्रीमंत देशांमध्ये स्वित्झरलँडचा सहभाग होतो. देशाकडे सध्या 1040 टन सोन्याचे भंडार आहे. दुसऱ्या महायुद्धात स्वित्झरलँड तटस्थ देश होता. त्यानंतर युरोपातील गोल्ड व्यापाराचे केंद्र म्हणून स्वित्झरलँड उदयास आला होता.

जपान : आशियातील महाशक्ती म्हणवणाऱ्या जपानकडे 765 टन सोन्याचे भंडार आहे. जपान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. सोन्याच्या भंडारात जपानचा जगात 8 वा क्रमांक लागतो.

नेदरलॅंड : ऐतिहासिक कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलॅंडकडे 612 टन सोन्याचे भंडार आहे. याबाबतीत नेदरलॅंडचा जगात 10 वा क्रमांक लागतो.

इटली : आपल्या ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध असलेल्या इटली देशात 2451.8 टन सोन्याचे भंडार आहे. यात बहुतांष सोन्याच्या विटा आहेत. बँक ऑफ इटली या सोन्याची देख-रेख ठेवते.

फ्रांस : देशाच्या मध्यवर्ती बँकेने काही सोने विकले होते. त्यानंतर फ्रांसकडे आता. 2435 टन सोन्याचे भंडार आहे. सोने भंडाराच्या बाबतीत फ्रांसचा चौथा क्रमांक लागतो.

रशिया : गेल्या सात वर्षात रशियाचे सोन भंडार 2299.9 टनांवर टिकून आहे. सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत रशिया जगात पाचव्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.