अवघ्या 53 व्या वयात प्रसिद्ध गायक केकेचं निधन झालं आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. केके च्या मृत्यूमुळे बॉलिवूड शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्त्यातील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ते सादरीकरण करीत होते. यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेंच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे.
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याला केके म्हणून ओळखले जात होते. कोलकात्यामध्ये त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्सर्ट सुरू असताना अचानक केके खाली कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कॉन्सर्ट सुरू असताना केकेला ह्रदयविकाराचा धक्का आला होता. त्यामुळे तो जागेवरच कोसळला होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
केके आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध होता. bluetooth च्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्ले-बॅक दिला आहे. हम रहे या ना रहे कल… पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी आज लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक विडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत.
केके याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडप तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बाॅइज, दसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता. हिंदीशिवाय मराठी, गुजरातील, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड गाण्यांनाही त्याने आपला आवाज दिला.
फिल्मसाठी गाणी गाण्यापूर्वी त्याने जवळपास 35000 जिंगल्स गायले आहेत. 1999 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमसाठी त्याने ‘जोश ऑफ इंडिया’ गाणं गायलं. पल या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली.
कृष्णकुमार कुन्नथ ‘केके’ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोक व्यक्त करत त्यांनी ट्विट केलं आहे.