आज मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा वाढदिवस

जन्म.१८ मे १९८८ खडकी पुणे.
एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावे देखील त्यांना दिली आहे. गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनाली कुलकर्णी या इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहतात तर ज्युनिअर सोनाली कुलकर्णी डबल ई लिहीते. सोनाली कुलकर्णी मुळची पुण्याची आहे.
सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या ‘नटरंग’ ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता, ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले. स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. सोनाली कुलकर्णीने ‘ग्रँड मस्ती’ ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली सोनाली कुलकर्णीने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे ‘सोशल मीडिया’वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत. अलीकडेच सोनाली धुरळा, हिरकणी, विकी वेलिंगकर हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. लवकरच सोनालीचा झिम्मा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी भाषांतील सुमारे ८० चित्रपटांत सोनाली कुलकर्णीने अभिनय केला आहे. गेल्या वर्षी सोनाली कुलकर्णी लग्नबंधनात अडकली असून कुणाल बेनोडेकर सोबत १८ मे २०२१ रोजी लग्न केले. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.

संजीव वेलणकर ,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.