आज दि.१७ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस; मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या ‘राजधानी’ला 50 वर्षे पूर्ण

भारतीय रेल्वेच्या इतिहासात काही सोनेरी पानं आहेत. त्यातलं एक पान म्हणजे राजधानी एक्सप्रेस. आज 17 मे रोजी सर्वांच्या आवडत्या राजधानी एक्सप्रेसनं 50 वर्षं पूर्ण केली आहेत. पन्नास वर्षांपूर्वी 17 मे 1972 ला बॉम्बे सेंट्रल ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली या मार्गावर राजधानी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली होती. ‘पीआयबी महाराष्ट्र’ ने याबद्दलचं ट्विट केलं आहे. ट्रेन क्रमांक 151 मुंबईतून 17 मे 1972 ला सायंकाळी 4.20 वाजता सुटली होती आणि दिल्लीला दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पोहोचली होती. ‘पीआयबी’ने याबद्दलचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे.

पाकिस्तानने ‘काश्मीर’मध्ये ओढलं विराटचं नाव, कोहलीला दिली ही ऑफर!

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे, यावेळी तर त्यांनी काश्मीर प्रकरणात थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचंच नाव घेतलं आहे. काश्मीर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विराट कोहलीला खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे. केपीएलचे अध्यक्ष आरिफ मलिक यांनी विराटला ही ऑफर दिली आहे. काश्मीर प्रीमियर लीगचं आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करतं. मागच्या वर्षी या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. विराट कोहलीला या लीगच्या दुसऱ्या मोसमात खेळण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं जाईल, असं आरिफ मलिक यांनी सांगितलं.

सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्री सचदेवाने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल

टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीमध्ये या मुलाने आपल्या आईला सायकल चालवत असताना धक्का दिला होता. त्यामुळे सिमरन सचदेवाने थेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.मुंबईच्या गोरेगाव येथील लोढा फिरोअन्झा इमारातीत राहणाऱ्या टिव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षाच्या मुलावर गोरेगाव येथील वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २७ मार्च रोजी घडली होती.

ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथे निवडणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्यासाठी पावसाचं कारण दिलं गेलं आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाने ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? असा सवाल करत जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा, असे आदेश दिले आहेत.

…तर हात तोडून हातात देईल, भाजप कार्यकर्त्यांच्या कृत्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रात यापुढे महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उभारल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.

ज्ञानवापीचा तिढा वाढणार, मुस्लीम पक्षकारांच्या आक्षेपानंतर कमिश्नर अजय मिश्रांची हकालपट्टी; अहवाल लांबणीवर

रामजन्मभूमी-बाबरी मशीद विवादाचा ऐतिहासिक निर्णय आल्याच्या अडीच वर्षांनंतर आणखी एक मंदिर-मशीद विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर आहे. हे प्रकरणदेखील अयोध्याप्रमाणे चर्चिलं जात आहे. वाराणसीमध्ये ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या सर्वे विरोधात मशीद प्रबंधन यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.वाराणसी कोर्टात मंगळवारी ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टाने कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांना तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लीम पक्षाने त्यांच्यावर आक्षेप व्यक्त केला होता. कोर्टाने सांगितलं की, कोर्ट कमिश्नरची जबाबदारी महत्त्वाची असते. यापुढे विशाल सिंह कोर्ट कमिश्नर राहतली. दुसरीकडे सिव्हील न्यायाधीश सीनिअर डिव्हिजनचा सर्वे रिपोर्ट दाखल करण्यासाठी कोर्टाने दोन दिवसांचा वेळ दिला आहे.

रात्री उशिरापर्यंत वरातीत नाचत राहिला नवरदेव; वैतागलेल्या नवरीने दुसऱ्यासोबतच घेतले सात फेरे

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका नवरदेवाला त्याच्या मित्रांसोबत डीजेवर डान्स करत बसणं चांगलंच महागात पडलं आहे. वरात घेऊन आलेल्या वराचा आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ पाहून नवरीला राग आला. यानंतर संतापलेल्या नवरीने संपूर्ण वरातच माघारी पाठवली. या गोंधळामुळे त्रस्त झालेल्या नवरीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी नवरीचं लग्न दुसऱ्याच तरुणासोबत लावून दिलं. यानंतर आता नवरदेवाकडच्यांनी पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली आहे.हे प्रकरण चुरू जिल्ह्यातील राजगढ तालुक्यातील चेलाना गावातील आहे. 15 मे रोजी हरियाणाच्या सिवानी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या अनिल यांचा मुलगा महावीर जाट आपली नववधू मंजू हिच्यासोबत लग्न करण्यासाठी वरात घेऊन राजगडच्या चेलाना बास येथे पोहोचला होता.

दाऊदच्या हस्तकांच्या आवळल्या मुसक्या; 1993 बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपी गजाआड

1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात एटीएसने एक मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत.
गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. सर्वचच्या सर्व आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.