राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या थरावर जाऊन फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता केतकी चितळेवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अकोला पोलीस सुद्धा केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह शब्दात टीका केली होती. केतकीने तिच्या फेसबुकवर कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला होता. या प्रकारानंतर अकोल्यात राष्ट्रवादी युवती काॕंंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर केतकी हिच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.