भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गोरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेला प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव , राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक , माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेवर 15 वार
1) उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला ते मास्टरसभा म्हणत होते. पण भाषण एकल्यावर ती लाफ्टर सभा होती हे लक्षात आलं. काल छत्रपती संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांचीदेखील जयंती होती. स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचे पोट फाटले असे नरसिंह यांची जयंती होती. काहीतरी तेजस्वी ऐकायला मिळेल, असं वाटत होतं. पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या, नवं असं काही मिळाली नाही. कालच्या सभेबाबत आमचे एक मित्र १०० सभांच्या बाप असं म्हणत होते. १०० संख्या ही कौरवांची संख्या, पांडवांसोबत पाच होते. कौरवांची सभा काल तिकडे झाली. आज पांडवांची सभा होत आहे.
2) मला एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर द्या. मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला की नाही? पालघर साधूंची हत्या झाली की नाही? वसूलीच्या आड आलेल्या मन्सुख हिरेन यांची हत्या झाली की नाही? १०० कोटींच्या वसुली प्रकरणी गृहमंत्री जेलमध्ये गेले की नाही? दाऊचा मित्र जेलमध्ये असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही? आमच्या मजूर भावांना अनवाणी मुंबई सोडावी लागली की नाही? मुंबई मेट्रो, रस्त्याचं काम बंद आहे की नाही? यशवंत जाधवची संपत्ती 35 पासून 53 झाली की नाही?
3) एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्यानंतर यापैकी एकाही विषयावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. आपले मुख्यमंत्री हे देशाचे आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांनी दीड वर्षांत राज्याच्या विकासाबाबत एकाही विषयाबाबत भाषण केलं नाही.
4) आम्ही आताच हनुमान चालीसाचं पठण केलं. हनुमान चालीसा आमच्या मनात असते. रवी राणा आणि नवनीत राणा हे नादान आहेत. त्यांना माहितीच नाही की हनुमान चालीसाची दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासूनच माहिती आहे. त्या दोन ओळींच्या आधारावरच ते काम करत आहेत. राम दुवारे जो मतवारे, हो न आज्ञा फिर रखवारे, या ओळींवर ते काम करत आहेत. राम दुवारे जो मतवारे, हो न आज्ञा फिर पैसा रे. त्यामुळेच 24 महिन्याच 53 प्रॉपर्टी निर्माण झाल्या. यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रीला ५० लाखांची घड्याळही भेट दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असा विचार केला असेल का की त्यांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालीसा बोलणं राजद्रोह मानला जाईल आणि औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकणं हा राजशिष्टाचार असेल, असा विचार त्यंनी कधी केला असेल?
5) मी जेव्हा म्हणालो रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली? अरे मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी मस्जिद गिरा रहा था, तुझे मिरची लगी तो मै क्या करु? अरे हा, मी बाबरी पाडण्याकरता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. उद्धवजी 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक अॕड. देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता.
6) तुम्ही सहलीला गेले होते. आम्ही सहलीला गेलो नव्हतो. तेव्हा तर सोडा, ज्यावेळी कारसेवा झाली तेव्हाही देवेंद्र फडणीस गेला होता. अनेक दिवस पदायूच्या जेलमध्ये होता. आजही जेलची आठवण आहे तिथे मी वाट पाहत होतो की, आम्ही पोहोचलो, कुणीतरी शिवसेनेवालं येईल. कुणीच आलं नाही. त्याआधी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झालं. मी विद्यार्थी परिषदेबरोबर आतंकवाद्यांचा मुकाबला करता, मनोबल वाढवण्याकरता देवेंद्र फडणवीस गेला होता. आम्ही फाईव्ह स्टारचं राजकार नाही तर जमीनीवरचं राजकारण केलं आहे.
7) जेव्हा गेलो तेव्हा तिकीट काढलं नाही. प्लॅटफॉर्म, फुटपाथ, मंदिरामध्ये झोपलो. गोळ्या झाडताना, लाठ्या मारताना पाहिल्या, लाठ्याही खाल्या म्हणून इथपर्यंत पोहोचलो. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही. जेव्हा त्या अयोध्येत बाबरी ढाचा पडत होता तेव्हा शेपट्या कोणी आणि कुठे टाकल्या होत्या? आम्हाला एका सांगा. कारसेवकांची थट्टा करणाऱ्यांना सांगू इच्छितो, जेव्हा देशाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही कारसेवक म्हणून जाणार.
8) उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही
9) बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा. जितकं वरती वाटतं त्यापेक्षा दप्पट खाली आहे. काल कुणीतरी वाघ म्हणून ट्विट केलं. त्यांना समजवून सांगा, वाघाचा फोटो काढला म्हणून वाघ होता येत नाही. वाघ असेल तर निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठला सामना केला? कुठल्या संघर्षाला तुम्ही होता? कुठल्याच संघर्षाला नाही. आजही दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो.
10) उद्धव यांनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धू्र्त आहे, हे खरंच आहे. ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा. वाघ हा भोळाच असतो. पण धूर्त कोण असतो? त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची नाही. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. अमित साटम यांनी भ्रष्टाचाराचं पुस्तक छापलं. बाळासाहेब वाघ होतेच. पण आता या देशात एकच वाघ आहे. त्या वाघाचं नाव नरेंद्र मोदी नाव आहे.
11) तुमचं हिंदूत्व हे गदाधारीचं आहे. तुम्ही म्हणाले आम्हाला लाथ मारली. लाथ गधा मारतो. खरा पहिलवान ठोकर मारतो. लाथ गाढव मारतो. लक्षात ठेवा हा बदललेला भारत आहे. काश्मीरमध्ये आमच्या एका हिंदूची हत्या केली तर २४ तासाच्या आत तीन दहशवाद्यांची हत्या करणारा हा नवा भारत आहे. तुम्ही सवाल विचारण्याचा आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. तुमच्याकडे शर्जिल आला, भारत तोडण्याचा बोलला, निघूनही गेला. तुम्ही काय-काय बोलले? एकप्रेमी प्रेमातून अॕसिड फेकतो. आमची संपत्ती घेऊन आणि दुसऱ्या सोबत लग्न केलं. ऑफिशियल घटस्फोट तर द्यायचा. कालचं भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होतं
12) आरएसएस यांच्याबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये आहे. आणीबाणी लागली त्यावेळी तुम्ही कुणाच्या बाजूला होता? त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींच्या बाजूला होता. त्यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र असल्याचं बोलतात. अरे कुणाच्या बापाची औकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं? मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो. काल जनसंघामध्ये बोलले. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅजेटियनमध्ये लिहिले आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीत जनसंघ होता. काय मनात येईल ते बोलायचं. इतिहास वाचायचा नाही. जेव्हा बोलायला काही नसलं की मुंबई वेगळी करायीचीय. अरे मुंबई आम्हाला वेगळी करायची आहेच. पण महाराष्ट्रापासून नाही तर तुमच्या भ्रष्टाचारापासून
13) काय म्हणाले? सकाळचा शपथविधी! अरे सकाळचा शपथविधी केला. पण तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण यशस्वी जरी झाला असता ना तरी माझ्या मंत्रिमंडळात कुठला वाझे झाला नसता. माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकाची हिंमत झाली नसती. अरे ज्याक्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाथ मारायची, ठोकर घालायची? असा विषय आमच्यासमोर आला असता त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवण्याऐवजी आम्ही त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. पण आज त्याचंही समर्थन करत आहेत. वर्क फ्रॉम जेल करत आहेत. त्यांचे फोटो छापले जात आहेत. आणि आम्हाला विचारतात, तुम्ही त्यांच्यासोबत बसले असते का?
14) छत्रपती संभाजी राजांना औरंगाजेबाने मारले, औरंगजेब संभाजींना फक्त धर्म बदलायला सांगत होता. पण संभाजींनी धर्म बदलला नाही. संभाजी राजांनी जीव गेला तरी स्वराज्य आणि स्वधर्म देणार नाही, असं सांगितलं. संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर तो असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे लाजा बाळगा, बघता काय? ग्लासभर पाण्यात डुबकी मारा. औवेसी ऐकून घे औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार.
15) जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार.