देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 407 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन बाधित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर हा 4.72 टक्क्यांवर आला आहे. आता दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 5,955 वर पोहोचली आहे.
होम आयसोलेशनमध्ये 4 हजार 365 रुग्ण
दिल्लीत 4 हजार 365 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 183 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. या दरम्यान 1 हजार 546 लोक बरेही झाले आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत 29,821 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
दिल्लीतील कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी 9,590 खाटा आरक्षित आहेत. त्यापैकी 212 रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे 9 हजार 378 खाटा रिक्त आहेत.
तर कोविड केअर सेंटरमध्ये 825 खाटा आणि कोविड आरोग्य केंद्रात 144 खाटा रिक्त आहेत. दिल्लीतील एकूण कंटेनमेंट झोन 1,630 आहेत. राजधानीत आतापर्यंत कोरोनाचे एकूण 1,89,2,832 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 1,86,0698 रुग्ण बरे झाले आहेत. तर 26 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत एकूण 5,955 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.