देशभरात सध्या लग्नाचा माहोल आहे. विविध ठिकाणी लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. त्यात आता जर एखाद्या नवख्या जोडप्याने तुम्हाला लग्नात गिफ्ट नं देता पैशाची मागणी केली तर…अशा प्रकारच्या घटना सध्या एका देशात घडतायत. या घटना आता इतक्या वाढल्यात कि त्याचा आता ट्रेंडच सुरू झाला आहे. हा ट्रेंड नेमका का सूरू झाला आहे ?
लग्नाच्या आहेरात नेमकं काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न साहजिकच सर्वाना पडतो. आहेरात पैसे द्यावे की एखादं गिफ्ट असे पर्याय आपल्याजवळ असतात. मात्र तिथे अमेरीकेत आता नवीन जोडपं आहेरात पैसे मागत आहेत. यामागचं कारण म्हणजे कोरोना. कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे संपुर्ण जगभरातील नागरीकांचे हाल झाले. दोन वर्ष लॉकडाउन व हाताला काम नसल्याने अनेकांचे आर्थिक परीस्थिती खालावली.
या दरम्यान काहींनी आर्थिक बोजा टाळण्यासाठी निर्बंधामध्येच लग्न केले. तर आता लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर नवीन जोडपी आपली आर्थिक परीस्थिती सुधारण्यासाठी आहेरात पैसे मागत आहेत.
काही जोडप्यांनी तर लग्नपत्रिकेवर, लग्नात यावं, जेवन जेवावे आणि लग्नाचा मनमुराद आनंद लुटावा असे पत्रिकेत म्हटले आहे. जर तुम्ही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर, कुठलंही महागड गिफ्ट न आणता, त्याऐवजी पैसे घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यामागे त्या जोडप्याचं कारण म्हणजे नवीन घर खरेदीसाठी पैशांची गरज आहे.
एका जोडप्याने आहेराबाबतची ही सुरूवात केल्यानंतर आता सर्वच जोडपी असा पर्याय वापरत आहेत. त्यामुळे अमेरीकेत आता आहेरात पैसे मागण्याचा ट्रेंड सूरू झाला आहे.