जमशेदपूर टाटा स्टील
प्लांटमध्ये मोठा स्फोट
झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतात पुन्हा एकदा
चक्रीवादळाचा धोका
भारतात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कामलीची वाढणारी उष्णता आणि त्यात होणारा अवकाळी पाऊस असं विचित्र हवामान सध्या भारतात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा धोका आहे. दक्षिण अंदमानकडे समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आंध्र प्रदेश-ओडिसा भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान
उष्णतेच्या लाटेचा अंदाज
मुंबईसह उपनगरातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट दिली आहे. विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे.
विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. नागपुरात 9 मे ते 11 मे दरम्यान कडाक्याचा उन्हाळा असेल.
नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची
सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का?
मनसुख हिरेन यांचं कुटुंब आता थोड स्थिरावलं आहे. त्यांच्या मी चर्चा केली, त्यानंतर ते ठीक आहेत. मनसुख हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते, त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार ना?, त्यामुळे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे. नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? नगराळे यांची बदली का केली गेली?,” असे अनेक प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ शो च्या नावाखाली
लाखोंचा गंडा
सुप्रसिद्ध रीअ़ॕलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ या शो च्या नावाखाली नागरीकांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमध्ये गंडा घालणारे आरोपी प्रेक्षकांना मेसेज आणि कॉल करून ठगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर अशाप्रकारे मेसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्हीही फ्रॉडला बळी पडाल.
इम्रान खान म्हणतात…
गाढव हा गाढवच असतो
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी स्वतःचीच खिल्ली उडवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वत:लाच गाढवाची उपमा दिली आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरीही त्यांची खिल्ली उडवत आहेत. द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खान पाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते. होस्टने त्यांना ‘पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात?’ असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, “मी सुद्धा २०-३० वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो पण मला कधीच मी त्यांच्यातला वाटलो नाही, मी त्या समाजाचा एक भाग होतो. त्यांनी मला स्वीकारले होते.
जालना शहराला बॉम्बने
उडवून देण्याची धमकी
ईसिस या दहशतवादी संघटनेत काम करत असल्याचं सांगत जालना शहराला बॉम्बने उडवून देण्याची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला व्हॉटस अँप मॅसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय. या धमकीमुळे शहरात खळबळ माजली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचं नाव आणि फोटो वापरून ही धमकी देण्यात आलीय. शेख अतिक शेख आयुब असे या कार्यकर्त्याचं नाव असून त्यांच्याच व्हॉटस अँपवर मॅसेज करून ही धमकी दिली आहे.
पंजाबमध्ये लिंबू घोटाळा समोर,
कारागृह अधीक्षक निलंबित
पंजाबमध्ये लिंबू घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी कपूरथला मॉडर्न जेलचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह मंत्री हरजोत बैस यांच्या आदेशानुसार कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण ५० किलो लिंबाच्या खरेदीशी संबंधित आहे. कारागृहातील लिंबू घोटाळ्यामुळे तुरुंगमंत्री हरजोत बैंस यांच्या आदेशानुसार एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे. कारागृह अधीक्षकांनी रेशन खरेदीमध्ये ५० किलो लिंबू दाखवले होते, तेव्हा बाजारात लिंबाचा भाव २०० रुपयांपेक्षा जास्त होता, त्या कैद्यांनाही हे लिंबू मिळाले नाहीत.
जॉनी बेअरस्टोने मिळवलं IPL मधील दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान!
आयपीएल हंगामातील 52 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टोच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 5 गडी गमावून 189 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले. आजच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोने केलेल्या कामगिरीमुळे आयपीएलमधील दिग्गजांच्या रांगेत त्याला स्थान मिळालं आहे.
SD social media
9850 60 35 90