पब्जी खेळायला मिळावं यासाठी बारा वर्षांच्या मुलाने घर सोडले

मुलं आणि तरुणांमध्ये ‘पब्जी’ या ऑनलाईन मोबाईल गेमची अत्यंत ‘क्रेझ’ आहे. पण या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत आहे. काहींनी पबजी गेमच्या वेडापायी आपले प्राण गमावले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतले. त्यामुळे गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. याची गंभीर दखल घेत केंद्रानेही या गेमवर बंदी आणली.

पण बंदी असतानाही लहान मुलं पब्जी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळायला मिळावं यासाठी बारा वर्षांच्या मुलाने घर सोडल्याची घटना घडली आहे. नांदेडमध्ये राहाणारा बारा वर्षांचा मुलगा पब्जी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला.

आई-वडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत मुलाचा मोबाईल ट्रॅक केला. यावेळी तो मुलगा मुंबई-तपोवन एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.