जळगाव : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने गर्जा महाराष्ट्र माझा या पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले.
चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य चोखपणे बजावत जाणाऱ्या तसेच सचोटीने कार्यसंस्कृती जोपासणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या साधना सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योजक उदय भाऊ पोतदार , ग. स. सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मनोज माळी, शौर्य पुरस्कार प्राप्त रवींद्र पाटील, हरित सेना प्रमुख प्रा. प्रवीण पाटील, पिंप्रीचे सरपंच ईश्वर पाटील, राजूभाऊ विसपुते, अक्षय सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गर्जा महाराष्ट्र माझा पुरस्कारार्थी याप्रमाणे
1,) दीपक पाटील 2 ) ज्ञानेश्वर पाटील 3) सुधाकर पाटील 4) राजीव गोसावी 5 ) मोहन वाघ 6) बाळासाहेब पाटील 7 ) आशाबाई नाथ 8 ) राहुल सपकाळे 9 ) परशुराम गावंडे10 ) रवींद्र पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन सर यांनी केले. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी प्रास्ताविकामध्ये पुरस्कार वितरणाची भूमिका स्पष्ट करून सांगितली. त्याच बरोबर समाजामध्ये वाढत्या व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली. समाजातील व्यसनाधीन व्यक्तींनी चेतना व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले. आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले
सागर डेरे, प्रतिक सोनार, रवी पाटील, महेंद्र सपकाळे, स्वप्नील तायडे या सर्वांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.