अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशी कुठेही
आरत्या करु नका : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या एका आवाहनामध्ये ईदच्या दिवशी मुस्लिमांना त्यांचा सण आनंदाने साजरा करु द्या असं म्हटलंय. “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका,” असं राज म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात कोणीही अल्टिमेटम
देऊ शकत नाही : अजित पवार
राज ठाकरेंच्या या भाषणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलं आहे. राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर सूर अवलंबून असतो अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींचे बर्लिन
विमानतळावर भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी जर्मनीच्या बर्लिनला पोहोचले आहेत. जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सला रवाना होणार आहेत. बर्लिन विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर पंतप्रधान थेट हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये भारतीय लोक आधीच उपस्थित होते आणि पंतप्रधान मोदींचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभात लहान मुले देखील उपस्थित होती. दरम्यान, पीएम मोदींनी मान्या या चिमुरडीचीही भेट घेतली आणि मान्यानेही पीएम मोदींशी संवाद साधला.
रामायण, भगवदगीतेवर आधारित
अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला पाहिजे
उत्तराखंडचे शिक्षण मंत्री धन सिंह रावत यांनी वेद, रामायण आणि भगवद् गीतेवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलंय. शालेय शिक्षणामध्ये हिंदू धर्मांमधील ग्रंथ आणि वेदांचा समावेश करण्यात आला पहिजे असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. धन सिंह रावत यांनी उत्तरखंडचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थितीबद्दल म्हणजेच भूगोलाबद्दल शिकवलं जाणार आहे असंही सांगितलं,
लसीकरणासाठी कोणावरही जबरदस्ती
केली जाऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट
लसीकरणासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असा महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र यावेळी कोर्टाने समाजाच्या रक्षणासाठी सरकार काही निर्बंध लावू शकतं असंही स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बी आर गवई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. करोना लस घेणं अनिवार्य करण्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. कोर्टाने यावेळी लसीसाठी जबरदस्ती करणं असंवैधानिक असल्याचं सांगत म्हटलं की, “अनुच्छेद २१ अंतर्गत शारीरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यात आलं. कोणालाही लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. सरकार काही नियम लागू करु शकतं”.
४८ तासात माफी मागितली नाही, तर आम्ही
कायदेशीर कारवाई करू : किरीट सोमय्या
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील ४८ तासात माफी मागितली नाही, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिलाय. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे. किरीट सोमय्या सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ‘महाडरपोक’ आहेत. ३ महिन्यात त्यांनी १२ वेळा स्टंटबाजी केली.
श्रीलंकेतील सरकारने
तत्काळ राजीनामा द्यावा
श्रीलंकेतील आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच, राजकीय पक्षांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवावेत असे आवाहन अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी केले. याच वेळी, ‘लोकाभिमुख लढा’ सुरू करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी आंदोलक नागरिकांना केले. देशातील राजकीय व आर्थिक संकट सोडवण्याच्या उद्देशाने मार्ग मोकळा करण्याकरिता गोताबया यांचे मोठे भाऊ व पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा न दिल्यास, सर्व राजकीय नेत्यांना नाकारण्यासाठी सर्व लोकांवर प्रभाव टाकण्यात येईल
राज ठाकरे जातीवाद
पसरवत आहेत : प्रविण गायकवाड
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय. “लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला,” असं मत प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
MHT CET 2022 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आहे ट्विट करून दिली होती. गेल्या काही दिवसांमध्ये JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी MHT CET Exam 2022 पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती आणि या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जहीर करण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार आता या परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
MHT CET 2022 च्या वेळापत्रकातील बदलाबाबत अफवा आणि अटकळ पसरत असताना, उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर MHT CET 2022 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबद्दलचा निर्णय जाहीर केला होता. “जेईई आणि एनईईटी परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” असं ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली होती. मात्र आता या परीक्षेच्या संभाव्य तारखांचं वेळापत्रक ऑफिशिअल वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे.
राणा दाम्पत्याला मोठा झटका, जेलचा मुक्काम पुन्हा वाढला
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आजदेखील दिलासा मिळालेला नाही. राणा दाम्प्त्याच्या जामीनाबाबत आज सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी पुढे ढकलण्याती आली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 4 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ऑर्डरची कॉफी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही निकाल ऐकवू शकत नाही, असं न्यायाधीशांनी आज कोर्टात सांगितलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या अक्षय्य तृतीया निमित्ताने सुट्टी असणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता 4 मे रोजीच सुनावणी होणार आहे. परिणामी राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम हा आणखी दोन दिवसांनी वाढला आहे. राणा दाम्पत्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे.
धनंजय मुंडेंचं राज ठाकरेंना खुलं आव्हान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेतील भाषणावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना समोरासमोर बसून इतिहासाच्या घडामोडींवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला राज ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे उतरविण्याबाबतच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. “पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न सुरु आहे”, असं धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवर म्हणाले आहेत.
SD social media
9850 60 3590