जवळजवळ ७ वर्षे चळवळीत आलेला कार्यकर्ता…. सॅटर्डे क्लब बोरीवली चाप्टर चे चेअरमन म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळल्यानंतर विश्वास वाढे यांच्याकडे वेस्टर्न मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली. ती विश्वासच्या विश्वासू नियोजनामुळे. पुढच्या वर्षाचे नियोजन आताच करा असे वारंवार सांगणाऱ्या विश्वास वाढे ने आज अचानक या जगाचा निरोप घेतला. ही बाब अतिशय क्लेशदायक आणि धक्कादायक आहे.
विश्वासाचा सेल्स या विषयावर अतिशय चांगला आणि गाढा अभ्यास होता. या विषयावर त्याने सखोल मार्गदर्शन करणारी १५/१६ पुस्तके लिहिली आहेत.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होत. ५ वर्षापूर्वी त्याला किडनीच्या आजाराने गाठले. नेहमी लोकांना फायटर व्हा, असे म्हणणारा विश्वास किडनीच्या आजाराशी लढा द्यायला सज्ज झाला. गेल्या पाच वर्षापासून तो या आजाराची लढत होता. यातच त्याची लढवय्या वृत्ती दिसून येते.
सॅटर्डे क्लबमध्ये MDP च्या माध्यमातून विश्वास कार्यरत राहीला. या काळात त्याने आजार आहे, याची जाणीवही होऊ दिली नाही. स्वतःच दुखणे बाजूला ठेऊन इतरांचा व्यवसाय कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित केले.
किडनीचा त्रास बळावत चालला होता. जवळच्या आमच्या सारख्या मित्रांना त्याचा त्रास बघवत नव्हता. तरी सुद्धा तो हसतमुख चेहऱ्याने वावरत होता.
अखेर आज नियतीने घाला घातलाच.
आणि किडनीच्या आजाराने आज मात केली…. विश्वास आपल्याला सोडून गेला.
आज ३१ मार्च…..विश्वास सगळ्यांना सांगायचा…. पुढच्या वर्षाच नियोजन करा. नकळतपणे नियतीने वेगळच नियोजन केले. एज्युकेशन हेडची जबाबदारी न घेऊ देता काळाने त्याच्यावर झडप घातली. विश्वास आपल्याला सोडून लिहून गेला तो कायमचा. आता यापुढे आपल्याला पुढच्या वर्षाचे नियोजन करा असे कोण सांगेल. असो नियतीच्या निर्णयापुढे कोणाचे काहीच चालत नाही, हेच खरे..
चळवळतील या झुंजार मित्राला त्रिवार मुजरा..!
नरेंद्र ह. बगाडे
(लेखक सॕटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे मेन्टाॕरिंग विभागाचे शिक्षण विभाग प्रमुख आहे.)