कार्तिकने घेतला KKR चा बदला, थरारक सामन्यात RCB चा विजय

दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सचा बदला घेत आरसीबीला आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला पहिला विजय मिळवून दिला. कोलकात्याने दिलेलं 129 रनचं माफक आव्हान पार करतानाही आरसीबीचं धाबं दणाणलं होतं, पण अखेरच्या ओव्हरमध्ये कार्तिकने एक सिक्स आणि एक फोर मारून टीमला जिंकवून दिलं. 7 बॉलमध्ये 14 रनवर कार्तिक नाबाद राहिला.

केकेआरने दिलेल्या 129 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था अत्यंत खराब झाली होती. 17 रनवरच फाफ डुप्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत हे टीमचे सुरूवातीचे तिन्ही बॅटर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण डेव्हिड विली आणि शरफेन रदरफोर्ड यांनी आरसीबीचा डाव सावरला. रदरफोर्डने सर्वाधिक 28 रन केले, तर शाहबाज अहमद 27 रन करून आऊट झाला.

केकेआरकडून टीम साऊदीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर उमेश यादवने त्याच्या मागच्या सामन्यातला फॉर्म पुन्हा कायम ठेवला. उमेशने 4 ओव्हरमध्ये फक्त 16 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत दिनेश कार्तिक हा केकेआरच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता. एवढच नाही तर आयपीएल 2020 पर्यंत तो टीमचा कर्णधारही होता, पण आयपीएल 2020 च्या मध्येच टीमने कार्तिककडून कॅप्टन्सी काढून घेतली आणि इयन मॉर्गनला टीमचं कर्णधार केलं. यानंतर या मोसमाआधी टीमने त्याला रिलीजही केलं. आता कार्तिकने आरसीबीकडून खेळताना केकेआरचा बदला घेतला.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि केकेआरला 128 रनवर रोखलं. वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. आकाश दीपला 3, हर्षल पटेलला 2 आणि मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 25 रन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.