आज दि.७ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष
पुतिन यांच्याशी संवाद

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे ५० मिनिटे चालला. त्यांनी युक्रेनमधील विकसित परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली, अशी माहिती सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

विमानांवर चीनचे झेंडे लावून
रशियावर बॉम्ब टाकावेत : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने एफ-२२ लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाकावेत असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर चीनने हे केलं सांगून आपण फक्त मागे बसून त्यांच्यातील भांडण पाहत राहायचं असंही यावेळी ट्रम्प म्हणाले. युएस मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर प्रेक्षक हसत टाळ्या वाजवत होते.

दक्षिण कोरिया रशियाच्या मध्यवर्ती
बँकेसोबतचे व्यवहार थांबवणार

रशियाविरुद्ध अतिरिक्त निर्बंधांचा एक भाग म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबतचे व्यवहार निलंबित करण्यात दक्षिण कोरिया युनायटेड स्टेट्स आणि इतरांमध्ये सामील होईल, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले. संबंधित सरकारी एजन्सींशी सल्लामसलत केल्यानंतर मंजुरीचे अधिक तपशील जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी, दक्षिण कोरियाने सात प्रमुख रशियन बँकांसह आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती.

ओबीसी आरक्षणाचं विधेयक
आज विधानसभेत मंजूर

ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत, निवडणूक वगळता इतर अधिकार राज्यसरकारकडे आले आहे. त्यामुळे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत
धरले सरकारला धारेवर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी उत्तर देत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा देत सरकारच्या उत्तरातील हवाच काढून टाकली. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांनी चालू महिन्याचे बिल भरले तर त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. त्यांच्या थकीत बिलाची जी रक्कम आहे त्याचे त्यांना हप्ते करून दिले जातील. त्यानुसार त्यांना सूट देण्यात येईल, असे सांगितले.

राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना
२१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना सात मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली. त्यानंतर आज मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणीनंतर नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

जर खोटं बोलत असेल तर
मला इथेच फाशी द्या : आमदार राणा

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस व मनपा प्रशासनाकडून काढून टाकण्यात आल्याने, याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास व मला अटक करण्यास सांगितलं असल्याचाही त्यांनी आरोप केला. याचबरोबर, “ माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये याबाबतचा पुरावा आहे, मी जर खोटं बोलत असेल तर मला इथेच फाशी द्या.” असं आमदार राणा यांनी सभागृहात बोलून दाखवलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात
कसे फिरतात हे आम्ही पाहू

भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हानच दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतकी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमात हाती घेऊ. मग चपला मोजण्याचं काम त्यांनी करावं.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.