बचतगट ते फार्मर प्रोड्युसर कंपनी, महिलांच्या जिद्दीची कहाणी

स्त्री ला चमकायचेच असेल तर तिला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचेच असेल तर स्वतः चेच तेज निर्माण करता आले पाहिजे.तेच तेज निर्माण केलय गायत्री स्वयंसहाय्यता समूह च्या महीलांनी बचतगट ते फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापनेपर्यंत मारली मजल मारली आहे. महिलांच्या जिद्दीची कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

बचतगटच झाला गावाचा आधारवड

२०१४ मध्ये १० महीलांनी पळासखेडा बु तालुका जामनेर येथे एकत्र येत गायत्री स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना केली. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद मधे वर्ग करण्यात आले. २०१४ ते २०२२ या वर्षांत दहा महीलांनी अनेक अडचणींवर मात करत मोठ्या कष्टाने बचत गटाचे उत्पादन व विक्री केली. त्यात उडीद पापड, लिंबू क्रश लोणचे, भाजणी चकली यांसारख्या वस्तूंची विक्री केली. त्यासोबतच आरोग्यदायी आवळा पावडर, आवळा अर्क यांचीही विक्री केली. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांचे व्यवसाय अडचणीत आले. पण या दहा जणी डगमगल्या नाहीत. त्यांनी याकाळात मास्क उत्पादन सुरू केले. कोरोनाच्या मंदीतही त्यांनी संधी शोधली आणि लॉकडाऊनच्या काळात तब्बल ९ लाख मास्क ची विक्री करून उच्चांक गाठला. आताफक्त बचतगटच नाही तर आता पुढचा टप्पा गाठला पाहिजे, या उद्देशाने त्यांच्यात आता नवी उमेद जागवली आहे.

फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना

त्यांनी गायत्री शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीच्या अध्यक्षा वंदना प्रभाकर पाटील या आहेत. तर महीला बचतगटाच्या अध्यक्षा कल्पना गोविंदा पाटील या आहेत. गायत्रीशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी मध्ये २८० सभासद आहेत. आता हा बचतगट आणि कंपनीच गावाच्या अर्थकारणाचा मुख्य आधारस्तंभ झाला आहे.

या बचतगटाने गेल्या काही वर्षांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यात राज्य शासनाच्या महालक्ष्मी सरस २०२० या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. ग्रामविकास विभागाच्या नाशिक गोदाई प्रदर्शनात सहभाग नोंदवला. उमेद हिरकणी नवउद्योजीका महाराष्ट्राची या स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटीच्या कार्यक्रमातही सहभागी झाल्या होत्या.
२०२०च्या महालक्ष्मी सरस मधे समूहाने ५ क्विंटल चकली, तीन क्विंटल पापड, दोन क्विंटल लोणचे विक्री केली होती. गायत्रीशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीला आता लिंबू पासून एनर्जी ड्रिंक तयार करायचा व्यवसाय सुरू करायचा आहे.

कृषी विभागाच्या केंद्र शासन सहायित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत गटाची निवड झाली आहे. त्यात फळ भाज्या निर्जलीकरण, पापड मशीन, लिंबू लोणचे मशीन यासाठी निवड करण्यात आली आहे
सामाजिक कार्यातही गट अग्रेसर असून पळासखेडा बु येथे १०० झाडे लावली. चिंचोली ता. जामनेर पाणी फाउंडेशनच्या कामात श्रमदान केले आहे. मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीत फराळ वाटप, दिपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला देणगी देखील दिली आहे. या गटाला हिरकणी नवउद्योजीका महाराष्ट्राची तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

२०२१मधे जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांचे हस्ते महीला किसान दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. लेवागुर्जर सेवा प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत पळासखेडा बु.ग्रामसंघामधे सत्कार करण्यात आला. गटातील महीलांनी महाराष्ट्र महीला आयोगाच्या प्रज्वला योजनेत सहभाग घेतला आहे.

या गटात अनिता पाटील, सुनंदा पाटील, प्राजक्ता पाटील, सोनाली पाटील, ज्योत्स्ना पाटील, कमल सोनवणे, मीरा सोनवणे, पुष्पा सोनवणे सहभागी आहेत.

महीलांनी बचतगट ते फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी मारलेली मजल ही नक्कीच स्पृहणीय आहे. इतर महीला बचतगटांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
महीला स्वयंसहाय्यता समूहांना प्रकल्प संचालक मीनल कुटे, सहायक प्रकल्प अधिकारी राहुल इदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विपणन हरेश्र्वर भोई, जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे, तालुका व्यवस्थापक कैलास गोपाळ, अमोल नप्ते यांचे मार्गदर्शन या गटाला लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.