आज दि.१४ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

तर आम्ही आणखी सर्जिकल
स्ट्राईक करू : अमित शहा

काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणं न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला. “आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू,” असं अमित शाह म्हणाले. गोव्याच्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची
दिवाळी सुद्धा अंधारात घालवू

ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे सरकारने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत दिलेली नाही दिवाळी पूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ असा इशारा अमरावातीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यी ठाकरेंना दिलाय. मुख्यमंत्री ठाकरे यांना शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी देवो यासाठी आपण अंबादेवीकडे साकडे घातले असे राणा यांनी सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिवाळी सुद्धा अंधारात घालवू”, असंही रवी राणा म्हणाले आहेत.

मंदाकिनी खडसेंना १७ ऑक्टोबर ते
२९ नोव्हेंबरपर्यंत ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

एकेकाळी भाजपाचे फायरब्रँड नेते असलेले मात्र नंतर पक्षांतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना दिला आहे. विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने या प्रकरणामध्ये मंदाकिनी यांना दिले आहेत.

आरएसएसमुळेच देश
सुरक्षित : प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जगामध्ये बंधुत्वभाव टिकून राहण्यासाठी आरएसएसच जबाबदार असल्याचा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलाय. तसेच उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच शांती मिळाली आहे असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

किनौर जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण
पूर्ण, देशातील पहिला जिल्हा

देशभरात कोरोना लसीकरणावर भर दिला जातोय. त्यासाठी १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्टही ठेवलं जात आहे. आता देशातील एका जिल्ह्यानं १८ वर्षावरील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे अशी कामगिरी करणारा हा जिल्हा देशातील पहिला जिल्हा ठरलाय. किनौर असं या हिमाचल प्रदेशमधील जिल्ह्याचं नाव आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली. हा टप्पा गाठणारा हा पहिला जिल्हा ठरला आहे.

पुराव्यासकट मी ईडीला
यादी देईन : उदयनराजे

उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले. जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले.

ड्रग्जबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस
देणार, गुजरात राज्यातील योजना

अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर आळा घालण्यासाठी गुजरात सरकारने एक बक्षीस योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ड्रग्जबद्दल माहिती देणारे, मग ते सरकारी अधिकारी असो किंवा खासगी व्यक्ती, त्यांना बंदी घातलेल्या अंमली पदार्थांच्या जप्त केलेल्या किमतीच्या २० टक्क्यांपर्यंत रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. मागील काही काळापासून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमधून तस्करी केलेले ड्रग्स भारतात आणण्यासाठी गुजरातची लांब किनारपट्टी प्रवेश बिंदू म्हणून उदयास येत आहे, त्याच पार्श्वभूमिवर गुजरात सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे ड्रग्स तस्करीला आळा बसेल, अशी आशा सरकारला आहे.

आर्यन खानला पुढील पाच दिवस
तुरुंगात काढावे लागतील

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या वकिलाने एनसीबीच्या प्रश्नांना आपली उत्तरे दिली. यानंतर, एनसीबीच्या वतीने, एएसजी अनिल सिंह यांनी आर्यनचे वकील अमित देसाई यांचा सामना केला आणि त्यांना आता जामीन का मिळू नये, असा युक्तिवाद केला होता. आजच्या सुनावणीत अनिल सिंह यांनी आपले उरलेले मुद्दे मांडले आहेत. आर्यन खानच्या जामीनावर निकाल न आल्यास त्याला पुढील पाच दिवस तुरुंगात काढावे लागतील.

पदोन्नतीतील आरक्षणसाठी
न्यायालयात बाजू मांडणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावं म्हणून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

म्यानमारमध्ये झालेल्या
हिंसाचारात 30 सैनिक ठार

म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या हिंसाचारात 30 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सॅगिंग परिसरात घडली. संपूर्ण म्यानमारमध्ये सैन्याविरोधात नागरिकांनी हत्यारं उचलली आहेत, आणि म्यानमारमध्ये गृहयुद्धाची शक्यता वाढली आहे. रेडिओ फ्री एशियाच्या माहितीनुसार, जंता सैन्याने अनेकांना घरात घुसून मारलं, सैनिकांनी याविरोधात हल्ला केला. 30 जंता सैनिक ठार झाल्याची माहिती आहे.

पहिली डीएनए-आधारित
कोरोना लस Zycov-D बाजारात

केंद्र सरकार जगातील पहिली डीएनए-आधारित कोरोना लस Zycov-D बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अहमदाबादस्थित Zydus Cadila ने या लसीचे 60 लाख डोस तयार केले आहेत आणि सरकार एकूण डोस खरेदी करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात कोरोना विरोधी लसीचे 28 कोटीहून अधिक डोस खरेदी करेल. यापैकी 22 कोटी डोस कोविशील्डचे, 6 कोटी लस कोवॅक्सीनचे आणि 60 लाख डोस डीएनए-आधारित Zycov-Dचे असतील. भारतीय औषध नियामकाने ऑगस्टमध्ये Zycov-D च्या आपत्कालीन मान्यता दिली होती.

एमपीएससी परीक्षांसाठी
वयोमर्यादा वाढवण्याची शक्यता

राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल चर्चा झाली. एमपीएससीमार्फत पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.