फळमाशीमुळे आंबा पिकाचे किती नुकसान होते ते आता नव्याने सांगायची गरज नाही. आंबा पिकण्याच्या दरम्यान तर फळमाशीचा प्रादुर्भाव तर फळामध्ये आळ्याच दिसतात. त्यामुळे पिकाचे पूर्णपणे नुकसान तर होतेच. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर त्याच्या रोपापासून योग्य निवड होणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर सरकारमान्य नर्सरीची निवड केली तर मोठे संरक्षण राहणार आहे. आंब्याच्या कलमी झाडांना एका बाजूने लाकडी आधार देणे गरजेचे आहे. तर दुसऱ्या बाजूला एरंडेल सारख्या वनस्पतींची लागवड करायची जेणेकरुन आंब्याला सुर्यप्रकाश मिळेल. लागवडीच्या काळाचे योग्य नियोजन आणि त्यानंतर जोपासणा झाली तर लवकरच आंब्याला फळे लागतात असे कृषितज्ञ डॉ. राजेंद्रप्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. के. सिंह यांनी सांगितले आहे.
आंबा झाडावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लागलीच किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. हे करीत असताना मजूरांवरील खर्च टाळण्यासाठी ट्रक्टराचा वापर सोईस्कर राहणार आहे. काढणीच्या दरम्यानही हाताने आंबे काढले तर त्याचा परिणाम होऊ शकतो पण मशिनच्या सहाय्याने तोडणी केली तर नुकसान टळणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.
फळमाशांमुळे फळाचे नुकसान होते. अंडी देणारी मादी फळात छिद्र करते. यामुळे फळाच्या पृष्ठभागावर खुणा व छिद्रे पडतात.अळ्या एकदा का फळामध्ये शिरल्या की मग फळाचा अर्काचे शोषण तर करतातच पण त्यानंतर फळाची नासधूस होते. अंडी देणारी मादी फळात छिद्र करते. यामुळे फळाच्या पृष्ठभागावर खुणा व छिद्रे पडतात. फळ शेवटी सडते आणि ते खाण्यायोग्य ही राहत नाही.फळमाशींची अंडी लहान, पांढरी व पातळ असतात. 2-4 दिवसातच त्या उबवतात आणि अळ्या तयार करतात. ह्या अळ्या दंडगोलाकार, लांबट, संकुचित आणि काहीशा खालच्या बाजूस वक्राकार असतात आणि त्यांच्या तोंडाचे हुक डोक्यावर असल्याचे कृषिततज्ञ डॉ. एस.के. सिंह यांनी सांगितले. या लहान अळ्यांना अन्न म्हणून फळांचाच अर्क दिला जातो. त्यामुळे रांगण्याऐवजी त्या उड्या मारतात त्यामुळे त्या फळातून बाहेर पडून जमिनीवर पडतात.
डागाळलेली फळे ही छाटून काढून टाकावी लागणार आहेत. शिवाय जमिनीवर पडलेली आणि डागाळलेली फळे एकत्र साठवू नये. त्यामुळे चांगली फळे नासण्याचा धोका असतो. परिपक्व झाल्यावरच फळ तोडावे लागणार आहे. याच दरम्यान, फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. त्यामुळे सतत फळपिक हे स्वच्छ ठेवावे लागणार आहे. एवढेच नाही तर खराब झालेली फळे ही नष्ट करावी लागणार आहेत. तर खराब फळे खताच्या ढिगाऱ्यातही टाकू नका शिवाय डुकरांना किंवा कोंबड्यांनाही खायला घालू नका तर त्यांचे प्रजनन स्त्रोत्रच काढून टाकणे गरजेचे असल्याचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे.