मराठीला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा, 4 हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपतींकडे रवाना

मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा मागणीची 4 हजार पोस्ट कार्डस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे.

हा “अभिजात” दर्जा 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा दिवस आहे. त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुमारे 4 हजार पोस्ट कार्ड्स राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्ड्स पाठविण्याचा दुसरा संच आहे, याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरु करण्यात आलेले आहे. “अभिजात” दर्जा मिळावा यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर एकटवले आहेत आणि या जनअभियानात सहभागी झालेले आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. मराठी भाषेला तात्काळ “अभिजात” दर्जा मिळण्याचा प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी उद्या सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जी. कृष्णा रेड्डी यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान “आवश्यक असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील आपण दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याासाठी आग्रहाची विनंती करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.

27 फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव दिवस जोशात आणि दिमाखात साजरा करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. तसंच एक पत्रच मनसेच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं आहे. ‘आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील.

हे इतक्या जोरदारपणे राजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील ते पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा, अशी सूचना राज ठाकरे यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.