आज दि.५ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

लता मंगेशकर यांची प्रकृती
गंभीर ,आयसीयूमध्ये ठेवले

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. काही काळापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा

उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.

दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत
जाणवले भूकंपाचे धक्के

दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान – ताजिकिस्तान सीमा प्रदेशात झाला. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्ली, जम्मू काश्मीर आणि आजूबाजूचा परिसरात ही या भूकंपाचे धक्के जाणवले.

ग्लोबल टीचर डिसले यांना
गैरहजर असताना तीन वर्ष दिले वेतन

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले हे सलग तीन वर्षे सेवेत गैरहजर असताना त्यांना वेतन देण्यात आल्याचे आढळून आल्यामुळे त्याचीही चौकशी सुरू झाली आहे. याबाबत डिसले हे शिक्षक असलेल्या माढा तालुक्यातील परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान कदम यांना शिक्षण विभागाने नोटिस बजावली आहे. परितेवाडी जि. प. प्राथमिक शाळेत सहशिक्षक असताना डिसले यांना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. परंतु तेथे ते सलग तीन वर्षे गैरहजर राहिले.

छातीत दुखू लागल्याने
नितेश राणे रुग्णालयात दाखल

भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना काही वेळात कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जणार आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती देण्यात आली. काल रात्री नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कणकवलीत आणण्यात आले होते.

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
भारत एक पाऊल दूर

सलग चौथ्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी होणाऱ्या महाअंतिम लढतीत हेच लक्ष्य साध्य करण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. परंतु यासाठी त्यांना इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या इंग्लंडचा अडथळा ओलांडावा लागेल. यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही.

हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची
न्यायालयीन कोठडी

हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. आज पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती.

मोस्ट वॉन्टेड आरोपी
अबू बकला यूएईतून अटक

परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला मोठं यश आलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाचील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकला यूएईतून अटक करण्यात आली आहे. 1993 साली मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. 29 वर्षानंतर अबू बक भारतीय यंत्रणांच्या हाती लागला आहे.

शिर्डी साई संस्थानच्या दानपेटीत
जुन्या नोटांचा ओघ सुरूच

शिर्डी साई संस्थानच्या दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे. साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. कोट्यावधीच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. दरम्यान याबाबत आता काही महिन्यांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. आता आरबीआय या नोटांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थानच्या कोटडी भागात
सोन्याची खाण सापडली

भारतात परकीय आक्रमण होण्यापूर्वी सोन्याचा धूर निघत असे, असं बोललं जायचं. ते देशात असलेल्या सुबत्तेमुळे. मात्र भारतातील जमिनीत दडलेलं सोनं आतापर्यंत आढळलं नव्हतं. मात्र आता आपल्या देशालाही सोन्याची खाण सापडली आहे. भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे. जमिनीखाली 60 ते 160 मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे. या खाणीत 600 किलो सोनं आणि 250 टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज आहे.

आता फास्टॅगही
लवकरच बंद होणार

सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. टोलनाक्यांवर वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी फास्टॅगची यंत्रणा सुरू केली. मात्र आता फास्टॅगही लवकरच बंद होणार आहे. पुढच्या काळात तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला टोल नाकेही दिसणार नाहीत. टोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला. मात्र आता हा फास्टॅगही इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या परिवहन आणि पर्यटन समितीनं फास्टॅग बंद करण्याची शिफारस केलीय.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.