राफेल नदालनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राफेलने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद जिंकलं आहे. थरारक झालेल्या सामन्यात राफेलने डॅनिलचा 2-6,6-7,6-4,6-4,7-5 असा पराभव केला. यासह राफेलने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचं जितेपेद जिंकलंय.
विशेष म्हणजे राफेल सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा पहिला टेनिस स्टार ठरला आहे. राफेलची ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची ही 21 वी वेळ ठरली. याआधी रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दोघांनी प्रत्येकी 20 वेळा ग्रँड स्लॅम जिंकण्याची कामगिरी केली आहे.
नडालने पहिले दोन सेट गमावले. त्यानतंर त्याने मेदवदेवचा एकूण 5 तास 24 मिनिटं चालेल्या थरारक सामन्यात पराभूत केलं.
पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये 5-4 असा स्कोर होता. चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी नडाल सर्व्हिस करत होता. तेव्हा मेदवदेवने त्याची सर्व्हिस मोडित काढली. त्याने पुढील सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक केली नाही. यासह जोमात कमबॅक करत राफेलने इतिहास रचला.
दरम्यान ऑस्ट्रेलिया ओपनमधील सर्वाधिक वेळ चाललेली हा दुसरी फायनल मॅच ठरली. याआधी 2012 मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने नडालचा 5 तास 53 मिनिटं रंगलेल्या सामन्यात पराभूत केलं होतं.