बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स होते, ज्यांनी आपल्या पहिल्या एक-दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं. यातील काही स्टार्स यशस्वी झाले तर काही स्टार्स चांगलं काम करूनही फारसे यशस्वी होवू शकले नाही . आम्ही अशाच एका बालकलाकाराबद्दल बोलत आहोत. ज्याने एका पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. आम्ही बोलत आहोत मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाबद्दल. ‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या आयुष्याभोवती फिरतो.
1988 चा सलाम बॉम्बे अकादमी पुरस्कारासाठी नामांकन झालेला भारतातील दुसरा चित्रपट होता. नंतर न्यूयॉर्क टाइम्सने बनवलेल्या सर्वोत्कृष्ट 1,000 चित्रपटांच्या यादीत या सिनेमानं स्थान मिळवलं. या चित्रपटाचे बालकलाकार शफिक सय्यद यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
या चित्रपटात काम केलेला बालकलाकार शफिक सय्यद याने झोपडपट्टीतील मुलाचं जीवन उत्तम प्रकारे साकारलं होतं. मात्र, या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकाराला सलाम बॉम्बेनंतर बॉलिवूडमध्ये फारसं काम मिळालं नाही. शफिकने घर चालवण्यासाठी खूप धडपड केली आणि काम शोधण्यासाठी धडपड केली. एक स्टार चमकला, ज्याचं कौतुक झालं, पण एकं दिवशी तो पुन्हा आठवणींच्या अंधारात हरवून गेला.
शफिक सय्यद लहानपणी बेंगळुरूहून मुंबईत पळून गेले होते. ईथे एका महिलेच्या माध्यमातून मीरा नायरच्या संपर्कात आले आणि त्यांना सलाम बॉम्बेमध्ये ही भूमिका मिळाली. नंतर मीरा नायरच्या ‘कटंग’ या दुसऱ्या चित्रपटातही त्यांनी काम केलं. या दोन चित्रपटांनंतर त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळालं नसलं तरी ते पुन्हा बंगळुरूला गेले. शफीक तिथे ऑटो रिक्षा चालवत आहेत. ते तिथे खूप संघर्षमय जीवन जगत आहेत. आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. १९८९ मध्ये या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.