मुलं हळूहळू आपल्याला हवं असलेला व्हिडीओ लावू लागतात, फोनचा इंटरनेट बंद केलात तरी, त्यांना ते सुरु करायचं समजतं इतकी ती हुशार होतात. त्यानंतर तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाही की मुलं जवळजवळ संपूर्ण फोन हाताळायला शिकतात.
तुम्हाला हे जाणून विश्वास बसणार नाही, परंतु एका 22 महिन्यांच्या मुलानं आपल्या मोबाईलवरुन आपल्या घरी फर्निचर ऑर्डर केला आहे. तुम्हाला हे पटत नसलं तरी ही खरी घटना आहे. ही घटना U Jersey मधील आहे, येथे आईच्या फोनसोबत खेळत असताना 22 महिन्यांच्या मुलाने असे काही केले की आई-वडील चक्रावले.
आजच्या युगात कोणताही गोष्ट विकत घेण्यासाठी फारसं फिरावं लागत नाही. कारण आता संपूर्ण बाजार हातात धरलेल्या मोबाईलवर उतरला आहे. या ऑनलाइन शॉपिंगमुळे लोकांना खूप दिलासा मिळाला आहे, पण यू जर्सीच्या या पालकांसाठी ही ऑनलाइन शॉपिंग तोट्याचा सौदा ठरली.
खरं तर, न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याने आपल्या 22 महिन्यांच्या मुलाच्या हातात मोबाईल दिला जेणेकरून तो आरामात खेळू शकेल. पण या मुलाने पालकांच्या बँक खात्यातून 1.4 लाख रुपये काढले.
प्रत्यक्षात त्यांच्या मुलांनी घरबसल्या मोबाईलद्वारे 1.4 लाखांचे फर्निचर ऑर्डर केले. याबाबत मुलाच्या पालकांना कोणतीही माहिती नव्हती. एक एक करून त्याच्या घरी फर्निचर पोहोचवले जात असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तर हे फर्निचर ऑर्डर केले नाही मग हे केलं कुणी? असा त्यांना प्रश्न पडला, जेव्हा त्यांनी या गोष्टी शाहनिशा केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, हा सगळा प्रकार त्यांच्या मुलामुळे घडला आहे.