आजकाल बहुतेक लोक व्यवहार आणि खरेदीसाठी रोखऐवजी इतर माध्यमांचा वापर करतात. यापैकी एक क्रेडिट कार्डदेखील आहे. मात्र लक्ष न दिल्यास त्याचा गैरफायदाही गुन्हेगार घेऊ शकतात. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या कार्डवरील अनधिकृत व्यवहार रोखू शकता.
ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. तुमचे कार्ड कधीही नजरेआड सोडू नका, खासकरून जेव्हा तुम्हाला ते विक्रीच्या ठिकाणी स्वाईप करावे लागते. विक्रेत्याने दुकान किंवा रेस्टॉरंट किंवा पेट्रोल पंपावर तुमच्या उपस्थितीत तुमचे कार्ड स्वाईप केल्याची खात्री करा.
तुमचा पिन नियमितपणे बदला
पिन तुमच्या व्यवहारांमध्ये सुरक्षितता वाढवते. तुम्हाला ओळखणारा कोणीही तुमचा पिन सहज शोधू शकत नाही, याची खात्री करा. तुमचा पिन कमीत कमी दर सहा महिन्यांनी बदला जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही.
तुमच्या बँकेकडून क्रेडिट कार्ड व्यवहारांशी संबंधित सर्व येणार्या एसएमएस अलर्ट तपासा. तुम्ही तुमची रक्कम अधिकृत केल्याची खात्री करा. अलर्ट व्यतिरिक्त आपल्याला आपले बँक स्टेटमेंटदेखील पूर्णपणे तपासण्याची आवश्यकता आहे. हे सुनिश्चित करेल की, तुमचा कोणताही संशयास्पद व्यवहार चुकणार नाही.
खरेदी करण्यापूर्वी वेबसाईट किंवा अॕपचे पुनरावलोकन वाचणे ही सर्वात महत्त्वाची सुरक्षितता टिपांपैकी एक आहे. आपण ऑनलाईन खरेदी करत असल्यास वेबसाईटच्या लिंकमध्ये https: // आहे याची खात्री करा.
इमेल आणि मेसेजमध्ये लिंक असतात जे क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून असल्याचा दावा करतात, जे फसवणूक किंवा फिशिंग हल्ले असू शकतात. बँक कोणत्याही व्यक्तीला फोन, ईमेल किंवा मजकुरावर पिन किंवा इतर तपशील विचारत नाही. प्रेषकाचा ईमेल पत्ता, लोगो आणि तळटीप काळजीपूर्वक तपासा आणि संशयास्पद आढळल्यास त्याबद्दल बँकेला कळवा.
तुमचे क्रेडिट कार्ड हरवले किंवा तुम्ही न केलेला व्यवहार तुम्हाला दिसल्यास ताबडतोब बँकेला कळवा.