देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 37 हजार 875 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 369 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 875 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 369 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 114 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 30 लाख 96 हजार 718 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 64 हजार 51 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 41 हजार 411 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 91 हजार 256 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 70 कोटी 75 लाख 43 हजार 18 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.