एमपीएससीचा पेपर नागपूरमध्ये फूटल्याचा दावा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की, सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. परीक्षा केंद्रावरील स्टाफने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपनं संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. परीक्षा केंद्रासमोर ठिय्या आंदोलनावर बसले. अभाविपच्या संबंधित कार्यकर्तीचा आरोप आहे की परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने तिच्यासमोर प्रश्न संचाचे तीन सीलपैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले. या घटनेनंतर अभाविपचे कार्यकर्ते आंदोलनावर बसले आहेत. संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा आज झाली. यातील एका प्रश्नसंचाचे सील नागपुरातील एका सेंटरवर नियमबाह्य पद्धतीने फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या घटनेनंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी tv9 शी बातचीत केली. परीक्षा केंद्रावर पेपर आणले त्यावेळेस पेपरची सील फुटलेली होती. परीक्षा सुरू होण्याआधी नमुना दाखल एका विद्यार्थ्यांची सही घेऊन सील फोडली जाते. पण असे काही झालेच नाही असा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा झाली. राज्यात एकूण 2 लाख 22 हजार 395 विद्यार्थी परीक्षा देणार होते. 390 पदांसाठी 2021 च्या जाहिरातीनुसार ही परीक्षा होत आहे.
राज्यात आज एमपीएससीचा पेपर झाला. काही समाजमाध्यमांमध्ये पेपर फुटल्याची बातमी येत आहे. परंतु, अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे स्पष्टीकरण एमपीएससीच्या ट्विटर अकावउंडमधून देण्यात आलंय. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यानंतर संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन करत बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.