आयटम साँगमुळे चित्रपटाला वेगळंच ग्लॅमर येतं. अशा आयटम साँग गाण्यासाठी स्टार अभिनेत्री किती मानधवन घेतात तुम्हाली माहितीये का? आज आपण समंथा, नोरा फतेही, मलायका अरोरा कतरिना कैफ या अभिनेत्री आयटम साँगसाठी किती मानधन घेतात हे जाणून घेणार आहोत.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. समंथाचा (samanth) पुष्पा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यातील समंथाचं आयटम साँग चांगलंच भाव खाऊन गेलं. एका रिपोर्टनुसार, समंथा एका आयटम साँगसाठी 5 कोटी मानधन घेत असल्याचं समोर आलं आहे.
नोरा फतेही (nora fatehi) एका आयटम साँगसाठी 50 लाख रूपये घेत असल्याची माहिती आहे. ‘दिलबर’ हे तिचं आयटम साँग चांगलंच गाजलं होतं.
मुन्नी बदनाम हुई’ फेम मलायका अरोरा (malayaka arora) एका आयटम साँगसाठी एक कोटी रुपयांचं मानधन घेते.
अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) 50 लाखांचं मानधन घेते. नुकतंच तिचं ‘टिप-टिप बरसा पानी’ हे गाणं प्रदर्शित झालंय.