सिंधुदुर्ग बँकेत विजयानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपच्या झालेल्या विजयानंतर अध्यक्षाच्या दालनातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो तात्काळ काढण्यात आले आहेत. याचं मुद्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा बँकेत शिवसेना आणि महाविकास आघाडीची सत्ता असताना नारायण राणेंचा फोटो देखील दालनात होता, तो त्यावेळी आम्ही हटवला नव्हता मात्र राणेंकडे सत्ता गेल्या नंतर त्यांनी आघाडीच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. ज्या बाळासाहेबांबद्दल राणे नेहमी बोलत असतात त्यांचा आणि शरद पवार यांचा फोटोही दालनातून हटवण्यात आला आहे. यातून राणेंची प्रवृत्ती समोर आली आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

नेत्यांचे फोटो हलवून आम्हाला फरक पडणार नाही. बाळासाहेबांची प्रतिमा तर आमच्या देवघरात आहे. त्यामुळे राणेंनी फोटो हलवले त्यातून त्यांचीच प्रतिमा लोकांसमोर आली आहे, अशी टीका नाईक यांनी केली आहे. तर मनिष दळवी यांनी संतोष परब हल्ल्याचा कट रचला आणि तो यशस्वी केला या कटामुळेच जिल्हाबँकेत मतदारांमधे भयभीत वातावरण झालं होतं. संतोष परब हे सुद्धा मतदार होते. काही मतदारांना आमिष दिली गेली. या भयभीत वातावरणामुळेच जिल्हा बँक भाजपकडे गेली. त्याची परतफेड म्हणून मनिष दळवी यांना जिल्हा बँकेचं अध्यक्ष करण्यात आलं, असा गंभीर आरोपही वैभव नाईक यांनी राणेवंर केला आहे.

भाजपचे प्रकाश बोडस विजयी भाजपचे दिलीप रावराणे विजयी भाजपचे मनीष दळवी विजयी भाजपचे महेश सारंग विजयी भाजपचे अतुल काळसेकर विजयी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी भाजपचे बाबा परब विजयी भाजपचे समीर सावंत विजयी भाजपचे गजानन गावडे विजयी

महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.