सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये ईशा गुप्ताचं नाव टॉपला आहे. ‘आश्रम ३’ वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे ती अधिक चर्चेत आली. ईशाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. वयाची ३५शी ओलांडली तरी ईशाला लग्न करण्यात रस नसल्याचंच दिसून येत आहे. पापाराझी छायाचित्रकारांनी ईशाला गाठलं. यावेळी तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला ईशाने दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ईशा कामानिमित्त घराबाहेर आली असताना पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. यावेळी एक छायाचित्रकार आपला मित्र लग्न करत नसल्याचं तिला सांगतो. ईशा यावर हसत हसत उत्तर देते, “तो बिचारा का लग्न करेल? मी देखील लग्न करणार नाही.”. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच बऱ्याच जणांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
सध्यातरी ईशाला लग्न या विषयापासून लांब राहायचं आहे असं दिसतंय. ईशाचं उत्तर ऐकून अनेकांनी ‘आश्रम ३’मधील संवादाबाबत कमेंट केली आहे. जपनाम, जपनाम अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच ईशाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी पसंती देखील दिली आहे. म्हणजेच इतक्यात ईशाला संसारामध्ये रमायचं नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.
ईशाच्या ‘आश्रम ३’मधील भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ईशाने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, “बोल्ड सीन चित्रीत करणं माझ्यासाठी आव्हानात्मक नसतं. कारण दहा वर्ष सतत तुम्ही एकाच क्षेत्रात काम करता तेव्हा बोल्ड सीन चित्रीत करणं ही काही मोठी गोष्ट नसते.” तसेच तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तर तिला ८ मिलियनपेक्षा अधिक लोक फॉलो करतात