करदात्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 चे Income Tax Return फाइल केलेले नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाइल करू शकता. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ही माहिती दिली आहे. करदात्यांची अडचण लक्षात घेता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच (CBDT)तर्फे नवीन डेडलाइन जारी करण्यात आली आहे.
याआधी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. सरकारने ही तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली होती. परंतु करदात्यांना आयटीआर फाइल (ITR Filing) कऱण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
ऑनलाईन आयटीआर फायलिंग नवीन पोर्टलवरून 7 जूनपासून सुरू करण्यात आला आहे. या पोर्टलचा www.incometax.gov.in इन्फोसिसने या पोर्टलला विकसित केले आहे. परंतु या पोर्टलवर आयटीआर फायल करताना काही वेळा तांत्रिक अडचणी येत आहेत.
यूपीएससी परीक्षेसंबंधी अधिक माहिती : www.upscgoal.com येथे जाणून घ्या.