कसोटी क्रिकेटमध्ये विराटचे 100 झेल पूर्ण

मागच्या दोन वर्षात भले विराट कोहलीला शतक झळकवता आले नसेल, पण आज केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्यादिवशी विराटने एक खास सेंचुरी पूर्ण केली. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण (Virat Kohli 100 catch) केले आहेत. या सामन्याआधी विराटच्या खात्यावर 98 झेल होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावात विराटने टेंबा बावुमा आणि रेसी वॅन डर डुसेचा झेल घेऊन कॅचचे शतक पूर्ण केले. हा टप्पा गाठणार विराट कोहली सहावा भारतीय खेळाडू बनला आहे.

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 209 झेल टीम इंडियाचे विद्यमान हेड कोच राहुल द्रविडने घेतले आहेत. त्यानंतर व्हीव्ही एस लक्ष्मण, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी 100 पेक्षा जास्त झेल घेतले आहेत. राहुल द्रविडने 163 कसोटी सामन्यात 209 झेल घेतले आहेत. लक्ष्मणने 134 टेस्टमध्ये 135 झेल घेतले आहेत. सचिनने 200 कसोटी सामन्यात 115 झेल घेतले आहेत. सुनील गावस्करने 125 कसोटी सामन्यात 108 झेल घेतले, तेच अझरुद्दीनने 99 कसोटीत 105 झेल घेतले आहेत. विराटने 99 कसोटीमध्ये हा टप्पा गाठला आहे.

विराट कोहलीने आपला 100 वा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये पकडला. विराटचा हा झेल पाहून सर्वचजण हैराण झाले. सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना विराटचे कौतुक केले. चेंडूने बावुमच्या बॅटची कड घेतली व स्लीपमध्ये गेला. त्यावेळी जमिनीच्या दिशेने चेंडूला विराटने शानदार झेलमध्ये बदलले. त्याआधी बावुमाचा सोपा झेल चेतेश्वर पुजाराने सोडला होता. विराटच्या या झेलने बावुमा-पीटरसनची 42 धावांची भागीदारी तोडली. ही जोडी तुटल्यानंतर भारताला झटपट दोन विकेट मिळाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.