आज स्वामी विवेकानंद यांची जयंती

ते साल होतं, 1984. याच वर्षापासून संपूर्ण भारतात राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या जयंतीदिनी साजरा होऊ लागला. या दोन्हींचं एकमेकांशी फार खास कनेक्शन आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन एकाच दिवशी असणं, हा योगायोग नाही. ही ठरवून करण्यात आलेली गोष्ट आहे. त्यामागे एक पद्धतशीर कारणही आहे. हे कारण अनेकांना माहीत नाही. स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता 12 जानेवारी रोजी. तर राष्ट्रीय युवादिन ही 12 जानेवारी 1984 पासून सााजरा केला आहे. पण स्वामी विवेकानंद यांचा जन्म 1863 रोजी झाला होता. तर राष्ट्रीय युवा दिन हा स्वामीजींच्या जन्मानंतर तब्बल 121 वर्षांनी पहिल्यांदा राष्ट्रीय युवा दिन साजरा केला गेला.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवकांसाठी एक विशेष आणि यादगार दिवस म्हणून पाहिला जावा, यासाठी 12 जानेवारील या दिवसाला महत्त्व देण्यात आलं. स्वामी विवेकानंद यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचं योगदान हे भारतीय युवांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत व्हाव, या उद्देशानं भारत सरकारनं 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जावा, अशी घोषणा केली.

स्वामी विवेकानंद हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. धर्म, इतिहास ,कला, समज, विज्ञान, साहित्य सगळ्याच क्षेत्राची त्यांचा जाण होती. शिक्षणासोबतच शास्त्रीय संगिताबाबतही त्यांना माहिती होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या अलौकिक विचारांमधून त्यांनी असंख्य तरुणांना दिशा दिली. प्रेरणा दिली. प्रोत्साहित केलं.

स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली कोलकामध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1898 साली गंगा नदीच्या किनाऱ्यावरील बेलूरमध्ये रामकृष्ण मठाचीही स्थापना केली होती. वयाच्या 25व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी संसाराचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव विवेकानंद पडलं. स्वामी विवेकानंद यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.