एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकल होतं. या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पाच दिवसांनंतर म्हणजेच प्रयत्नांना यश आलं. केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आले आहे.
हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतल्या भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये अनेक टग बोट्स म्हणजेच मोठे जहाज अडकल्यानंतर ते खेचून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष बोटी वापरण्यात आल्या. सुएझ कालवा प्राधिकरणाने जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं होतं. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १० बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.