नव्या वर्षात महागाईचा भडका, वस्तूंच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता

आजपासून बरोबर पाच दिवसांनी हे वर्ष संपणार आहे. पुढील वर्ष कसे जाणार, असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडत असतो. मात्र पुढील वर्ष महागाईच्या दृष्टीने जर प्रतिकुलच जाण्याची लक्षणे आहेत. पुढील वर्षी इंधनाच्या दरामध्ये आणखी वाढ होऊ शकते, खाद्य तेलाच्य किमती देखील वाढू शकतात. तसेच विविध प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

एफसीजी कंपन्या पुढील तीन महिन्यांमध्ये आपल्या उत्पादनाचे दर चार ते दहा टक्क्यांनी वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. तसा अप्रत्यक्ष इशाराही अशा कंपन्यांकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आणि विविध दुचाकी आणि चारा चाकी निर्मिती कंपन्यांनी या आधीच आपल्या उत्पादनाचे दर 3 ते 5 टक्क्यांनी वाढवले आहेत. कच्च्या मालाच्या किमती जर अशाच वाढत राहिल्यास पुढील वर्षांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर हे दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे महागाईचा मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसू शकतो.

गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना काळात उत्पन्न आणि पुरवठा अशा दोन्ही साखळ्यांना मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा आयातीला बसला होता. आपण अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात करतो. मात्र लॉकडाऊनकाळात आयात पूर्णपण ठप्प असल्याने भारतामध्ये सध्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे प्रोडक्ट निर्मितीचा वेग कमी होऊन, मागणी वाढली आहे. उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याने देखील महागाई भडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.