एकाच कुटुंबातील वडिल-मुलगा, वडिल-मुलगी, आई-सुन राजकारणात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. पण एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ राजकारण आल्याचं आणि थेट विधानसभेचे आमदार झाल्याची घटना कधी ऐकली आहे का? पण कर्नाटक विधानसभेत हे शक्य झालं आहे. चार सख्खे भाऊ आमदार होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे.
बेळगावमधील जारकीहोळी कुटुंबातील तिघे भाऊ विधानसभेचे आमदार आहेत, तर आता एक भाऊ विधानपरिषदेचा सदस्य झाला आहे.
जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठा भाऊ रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघंही भाजपचे आमदार आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर सतीश हे यमकनमर्डी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. आता अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.