कोरोना व्हायरस (COVID-19) चा सामना करण्यासाठी सध्या लस हा एकमेव उपाय आहे. सर्वच देश कोरोनामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करण्यावर भर देत आहेत. लोकांना लवकरात लवकर लस घेण्यासाठी आवाहन करत आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला होता. पण याच देशातील यूएस एअर फोर्सच्या 27 सदस्यांनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, यूएस वायुसेनेचे प्रवक्ते अॅन स्टेफनेक (हवाई दलाचे प्रवक्त्या) यांनी सांगितले की या सैनिकांना ते लस घेण्यास का नकार देत आहेत हे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही.
आतापर्यंत हवाई दलातील 97 टक्के सैनिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी अमेरिकेच्या लोकसंख्येच्या लसीकरणापेक्षा जास्त आहे. सध्या अमेरिकेच्या हवाई दल आणि अंतराळ दलात सुमारे 3 लाख 26 हजार सैनिक कार्यरत आहेत. त्याच वेळी, विविध सैन्यात तैनात असलेल्या 79 अमेरिकन सैनिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.