सांगलीच्या पठ्ठ्यानं कष्टाचं चीज केलं! 21व्या वर्षी पदक, आईवडील विकतात चहा

संकेत महादेव सरगरने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे. त्याने वेटलिफ्टिंगच्या 55 ​​किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकापासून तो एक किलो दूर राहिला. मलेशियाच्या मोहम्मद अनिदने 249 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले. संकेतने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 111 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात संकेतने 135 किलो वजन उचलले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. यादरम्यान त्याला दुखापतही झाली. तो पदक घेण्यासाठी आला तेव्हा त्याच्या हातात पट्टी बांधलेली होती. पण या 21 वर्षीय युवा खेळाडूने पदक जिंकून इतिहास रचला.

संकेत महादेवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. सांगलीत राहणाऱ्या संकेतचे वडील भजी आणि चहा विकण्याचे दुकान आहे. त्याची धाकटी बहीण, 17 वर्षीय काजल हिने या वर्षी जूनमध्ये झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 113 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले आहे. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याचे वडील म्हणाले होते की, आम्ही रोज फक्त चहा भजी विकतो आणि तेच करू.

संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते

शहरातला संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल याठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दाम्पत्य राबत असते. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहीण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली. इंग्लंडमध्ये पार पडणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात भारताचे प्रतिनिधित्व करत 55 किलो गटांमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. 248 किलो वजन उचलत संकेतने कॉमनवेल्थ स्पर्धेतलं भारताला पहिलचं पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंब आणि त्याच्या मित्रपरिवारने जल्लोष साजरा केला आहे. नुकतेच हरियाणा या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया युज गेम्स मध्ये संकेतची लहान बहिण काजल हिने सुवर्णपदक पटकावल्या होते. तिच्या यशाची सर्वत्र चर्चा झाली होती. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात मध्ये काजल सरगर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं होतं. त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवलं आहे.

भावामुळे बहिण खेळात

त्यांनी सांगितले की मी सर्व ग्राहकांना माझ्या मुलीच्या पराक्रमाबद्दल सांगितले आणि सर्वांनी माझे अभिनंदनही केले. वडिलांसोबत चहाच्या स्टॉलवर काम करताना रेडिओवर किंवा फोनवर स्पोर्ट्स कॉमेंट्री ऐकून मोठा भाऊ संकेत यांच्यानंतर काजोलने वेटलिफ्टिंगमध्ये प्रवेश केला. काजोल म्हणाली की, माझ्या वडिलांची नेहमी इच्छा होती की आम्ही खेळाचा सराव करावा आणि जेव्हा त्यांना वेटलिफ्टिंग अकादमीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी माझ्या मोठ्या भावाची नोंदणी केली. पुढे मीही त्यात सामील झाले.

संकेतने 2020 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 55 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकले. तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. यापूर्वी त्याने सीनियर नॅशनल आणि खेलो इंडिया युथ गेम्समध्येही सुवर्णपदक पटकावले होते. तेव्हा ते म्हणाले होते, आमच्या भागातील मुले क्वचितच दुसरा कोणताही खेळ खेळतात. मी 13 वर्षांचा असताना वेटलिफ्टिंगमध्ये प्रवेश केला. मी दररोज सुमारे 12 तास प्रशिक्षण घेतो. या मेहनतीनंतर माझी राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. रौप्य पदक जिंकल्यानंतर ते म्हणाले की, माझे हे पदक स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.