आज दि.१५ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नगरपंचायतींच्या निवडणुका
ओबीसी आरक्षणाविनाच होणार

राज्य सरकारसोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देता येणार नाहीत, असं आधीच न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे त्यावर राज्य सरकारच्या आशा संपुष्टात आल्या. मात्र, हा डेटा राज्य सरकार गोळा करेपर्यंत राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.

आमच्याकडे डेटा नाही, आंदोलनाशिवाय
पर्याय नाही : छगन भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, “भारत सरकारच्यावतीने हे सांगण्यात आलं की हा डाटा आम्ही ओबीसीसाठी गोळाच केला नाही. केंद्राकडे ओबीसींचा डेटा नव्हता, मग देवेंद्र फडणवीसांनी कोणता डेटा त्यावेळी केंद्राकडे मागितला? त्यावेळा ते म्हणाले नाहीत, की डेटा नाही, किंवा सदोष आहे. केंद्र सरकार त्यावेळेला काहीही बोलले नाही. मात्र आता केंद्र सरकार एकच म्हणत आहे, आता आमच्याकडे डेटा नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन

तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं.

काबूलच्या संरक्षणासाठी
तालिबानला बोलावले

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी काबूलवर तालिबानने मिळवलेल्या नियंत्रणाबाबत भाष्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी आपण तालिबानला काबूलमध्ये बोलावले होते, असे त्यांनी म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतली नाही तर त्यांना आमंत्रित केले होते असे करझाई यांनी म्हटले आहे. काबूलच्या संरक्षणासाठी आणि देश अराजकतेच्या गर्तेत सापडू नये म्हणून तालिबानला बोलावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवारांना भेटले
उदयनराजे भोसले

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीय. उदयराजे भोसले यांनी नवी दिल्लीतील 6 जनपथ या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतलीय. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सातारा जिल्हा बँक निवडणूक आणि आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

शिवसेना अजून यूपीएचा
भाग नाही : संजय राऊत

शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही. मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू आहे. काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. आता पुन्हा एक बैठक होणार आहे, अशी माहिती बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये दिली. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरेच शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का, या चर्चेमध्ये पुन्हा एकदा रंगात आली आहे

रोहित शर्मा आणि विराट
कोहली यांच्यात वाद

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वाद सुरु असल्याची सध्या चर्चा आहे. विराट कोहलीला अचानक एकदिवसीय संघाच्या कर्णधारदावरुन हटवत रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. मात्र यामुळे दोघांमध्ये वाद सुरु असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. खेळापेक्षा कोणी मोठं नाही असं सांगताना अनुराग ठाकूर यांनी संबंधित फेडरेशन, संस्थांनी यासंबंधी अधिक माहिती दिली पाहिजे असं म्हटलं आहे.

गँगस्टर सुरेश पुजारीला
अखेर भारतात आणलं

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला अखेर भारतात आणलं गेलं आहे. फिलिपीन्समधून त्याला अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मुंबई आणि कर्नाटकात तो वसूलीच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याला भारतात आणलं गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.