खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.
अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर म्हटलं की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.
खासदार कोल्हे यांनी त्यांचे मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरे आणि सर्व कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगितले. ते म्हणाले की, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.