रक्षा खडसेंनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट

उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारण सध्या मोठी उलथापालथ आणि राजकीय घमासान सुरू आहे. गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकमेंकांना शह देण्यासाठी ताकद लावत आहे. त्यातच काल रक्षा खडसेंनी गुलाबराव पाटलांची भेट घेतल्याने या भेटीची जास्तच चर्चा होऊ लागली. आता त्या भेटीबाबत विचारले त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. भेट ही विकासकामाच्या मुद्द्यावरून झाली. केंद्रातील जल जीवन मिशन योजनेबाबतची भेट झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एकीकडे गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे एकमेकांवर तुटून पडत आहेत.

खडसेंनी टीका केली की त्याला पाटील उत्तर देताहेत आणि पाटलींनी टीका केली की खडसे खरपूस समाचार घेत आहेत. महाविकास आघाडीत एकत्र असूनही या नेत्यांचा अंतर्गत संघर्ष संपायचे नाव घेत नाहीये.

शिवसेना आणि भाजपच्या छुप्या युतीबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत अशा युतीबाबत वरिष्ठांचे आदेश नाहीत. मला असे वाटते राज्यात महाविकास आघाडी-भाजप संघर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेना-भाजप युतीची परिस्थिती राहणार नाही. मात्र निवडणुका पुढे कशाप्रकारे लढवायच्या हे नेतेमंडळी ठरवतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मुक्ताईनगरात शिवसेना काँग्रेस गुप्त बैठक यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या निवडणुका समोर येत असल्यामुळे सर्वच नेते आता स्थानिक लेव्हलवर बैठका घेतील, असे त्या म्हणाल्या आहेत.

तसेच खडसे आणि इतर नेत्यांच्या वादाबाबत विचारले असता, जळगाव जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अग्रेसर आहे. हे तिघेही नेते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती पक्ष बळकट करण्याची धुरा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी पुढच्या निवडणुका कठीण राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत उभे केलेले उमेदवार निवडून आणण्याचे चालेंज त्यांच्यापुढे राहणार आहे. त्या कारणास्तवर काही वार-पलटवार सुरू असतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बोदवड नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेने घरोबा करत सत्ता स्थापन केल्याने खडसेंना मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीतील गुलाबराव पाटील विरोधात जात असल्याने खडसेंकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.