तळीरामांसाठी खुशखबर आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या काळात दारू पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यानं यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार आहेत. दारूची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.
तीन दिवस पहाटे पाचपर्यंत दुकानं सुरू राहणार
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या घोषणेनुसार राज्यातील दारूची दुकानं यंदा 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस पहाटे पाचवाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यंदा नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता असून, महसुलात देखील वाढ होणार आहे.