चोरीच्या गुन्ह्यात मुलाला पकडले पित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलिसांनी मुलाला अटक केल्याचं समजताच वडिलांना मोठा धक्का बसला. यावेळी आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने पित्याचा जीव घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात हा हृदयाला चटका लावणारा प्रसंग समोर आला आहे.

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाईक चोरी प्रकरणात अटक केली होती. अमजद शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आपल्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं त्याच्या वडिलांना समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
चोरी प्रकरणात मुलाला अटक होताच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्याचा वडिलांनी इतका धसका घेतला, की त्यांची प्रकृती सुधारलीच नाही. अखेर हार्ट अटॅकनंतर त्यांचा मृत्यू झाला.

शब्बीर शेख असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तारू पिंपळगाव येथे ही घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.