भूकंपवाला नॉस्रेदमस! 3 दिवस आधीच केली होती तुर्कीच्या भूकंपाची भविष्यवाणी

सोमवारी तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे प्रचंड वित्त आणि जिवीत हानी झालीय. तुर्कीला दिवसभरात ३ मोठे भूकंपाचे धक्के बसले. पहिला भूकंपाचा धक्का ७.८ रिश्टर स्केल इतका होता. यामुळे इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या. हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून बचावकार्यासाठी जगभरातून मदत सुरू आहे. मृतांचा आकडा तीन हजारांच्या वर पोहोचला असून ५ हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. चार देशांमध्ये भूकंपाचे हादरे बसले असून तुर्की आणि सीरियात सर्वाधिक नुकसान झालंय. दरम्यान, या भूकंपाबाबत एकाने केलेल्या भविष्यवाणीवरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

ट्विटर युजर्सने म्हणणे आहे की, या भूकंपाची भविष्यवाणी तीन दिवसांपूर्वीच केली गेली होती. भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सोलर सिस्टिम जिओमेट्री सर्व्हेचा संशोधक फ्रँक हुगरबीटसने भविष्यवाणी केली होती. आज नाही तर उद्या दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या जवळपासच्या भागात ७.५ तीव्रतेचा भूकंप येईल.

फ्रँकने ३ फेब्रुवारीला ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, आज नाही तर उद्या ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप दक्षिण मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये होईल. फ्रँकला भूकंपाबाबत शंका होती पण दुर्दैवाने ती खरी ठऱली. फ्रँकचे म्हणणे आहे की, भविष्यवाणी सेस्मिक एक्टिव्हीटी आणि ग्रहांच्या आधारे करतो.ट्विटर युजर्सनी फ्रँकला खोटा वैज्ञानिक म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं की, हा माणूस ग्रहांच्या हालचालींवरून भूकंपाची भविष्यवाणी करत आहे. याने यापूर्वी केलेल दावे चुकीचे ठरले आहेत. फक्त ही एक भविष्यवाणी खरी ठरली.

भूकंपाची माहिती मिळवण्याची कोणती अचूक पद्धत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका युजरने म्हटलं की, सिस्मॉजीस्टनी वेळोवेळी फ्रँकच्या भविष्यवाणी विज्ञानाला धरून नसल्याच्या आणि भ्रामक असल्याचं सांगत फेटाळल्या आहेत.

फ्रँकने २०१८ मध्येही भूकंपाबद्दल एक भविष्यवाणी केली होती. तेव्हा त्याला भूकंपाचं भविष्य सांगणारा असंही म्हटलं गेलं होतं. पण तेव्हाची त्याची भविष्यवाणी खोटी ठरली होती. दरम्यान, आता तुर्कीबाबत व्यक्त केलेली शंका खरी ठरल्यानं फ्रँकने दु:ख व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.